wedding esakal
नाशिक

विवाह मुहूर्त टळले, तर वर्ष वाया जाणार... !

पुढील महिन्यातील लग्न मुहूर्त टळले, तर वर्षभर वाट पाहावी लागणार

तुषार महाले

नाशिक : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन लावण्यात आले आहे. याचा सर्वाधिक फटका २२ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लग्नतिथीशी निगडित सर्व व्यवसायाला बसणार असून, पुढील महिन्यातील लग्न मुहूर्त टळले, तर वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.

मंगल कार्यालय, केटरिंग, बँड व्यावसायिकांचे दुसरे वर्ष आर्थिक कोंडीत

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक सापडल्यानंतर प्रशासनाने प्रथम विवाहांवर निर्बंध आणले होते. त्यामुळे मंगल कार्यालय, केटरिंग, बँड, डेकोरेटर, फुलविक्रेते आदी व्यावसायिकांना नुकसान सोसवे लागले. विवाहातील उपस्थितीवर निर्बंध कायम होते, परंतु थोड्याफार प्रमाणात व्यवसाय सुरू असल्याने आर्थिक कोंडी होत नव्हती. गेल्या मार्चमध्ये लॉकडाउन लागल्यानंतर सात महिने व्यवसाय ठप्प असल्यामुळे नुकसान झाले होते. आताही मार्चनंतर लग्नाचे मुहूर्त असूनही कोरोनामुळे व्यवसाय ठप्प आहेत. मार्च-एप्रिल या दोन महिन्यांत तब्बल २२ मुहूर्त असून, त्यात सर्वाधिक १७ मुहूर्त एप्रिलमध्ये आहे.त्यामुळे सलग दुसरे वर्ष आर्थिक कोंडीत सापडले असल्याची व्यथा व्यावसायिकांनी दिली.

लग्नसमारंभासाठी २५ लोकांना परवानगी

व्यावसायिक त्यांच्या कर्मचाऱ्यांना पोटापाण्यासाठी व्यवस्था व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे इतर घटकांप्रमाणे लग्नसराईशी निगडित केटरिंग आचारी, बँड, घोडेवाले, फोटोग्राफर, डेकोरेटर, फुलविक्रेते, मंगल कार्यालयातील कर्मचारी आदींना आर्थिक मदत सरकारने करावी, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. चालू तसेच पुढील महिन्यातील मंगल कार्यालयातील बुकिंग रद्द झाल्या आहेत. सरकारने लग्नसमारंभासाठी २५ लोकांना परवानगी दिली. परंतु मंगल कार्यालय, लॉन्सला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे लग्न करायची कुठे, हा प्रश्न लग्न घरातील मंडळींना पडत आहे. आता लावलेले निर्बंध केव्हा उठतील, हे माहीत नसल्याने पुढील महिन्यातील लग्न मुहूर्त टळल्यास दिवाळीनंतरच्या मुहूर्तांची वाट लग्नसमारंभाशी निगडित व्यावसायिकांना पाहावी लागणार असून, यामुळे प्रचंड आर्थिक कोंडी होणार आहे.

मंगल कार्यालयासह आमच्याशी निगडित असणारा सर्व वर्गाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला आहे. मंगल कार्यालयातील वीजबिलासह येणाऱ्या जीएसटीचा भार आला आहे. प्रशासनासोबत आम्ही कायम सोबत आहोत. सरकारने वर्षभरात आमच्याबाबत कधीच सकारात्मक विचार केला नाही. ते होणे अपेक्षित असून, नोव्हेंबरपर्यंत व्यवसाय ठप्प राहणार आहे.

-सुनील चोपडा, अध्यक्ष, मंगल कार्यालय लॉन्स असोसिएशन

वर्षभरापासून व्यवसाय अडचणीत सापडला असून, कोरोनामुळे सर्व थांबले आहे. वर्षात मोजून ५० मुहूर्त मिळतात त्यावर व्यावसायिकांचे पूर्ण वर्षभराचं गणित अवलंबून असते. या क्षेत्रात अनेकांचे रोजगार आहेत. पुढचे मुहूर्त आता डिसेंबरमध्ये आहेत. येत्या काळात केंद्र, राज्य सरकारने परवानगी दिली नाही, तर सलग दुसऱ्या वर्षी अडचणी येणार आहेत.

-उत्तम गाढवे, अध्यक्ष, केटरिंग असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

SCROLL FOR NEXT