Professionals in creating flower garland  esakal
नाशिक

Nashik News : लग्नसराई, धार्मिक कार्यक्रमांमुळे फुलांची मागणी वाढली; वाढत्या थंडीचाही फटका

थंडीच्या तडाख्याने बाजारात फुलांची आवक मंदावली आहे. केवळ ४० टक्के आवक होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : थंडीच्या तडाख्याने बाजारात फुलांची आवक मंदावली आहे. केवळ ४० टक्के आवक होत आहे. लग्नसराई आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे मागणी वाढल्याने दर कडाडले आहे. दैनंदिन दरांमध्ये वाढ होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात प्रचंड थंडी जाणवू लागली आहे. शेती पिकांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. (Weddings religious events increased demand for flowers nashik news)

त्यात फूल शेतीचादेखील समावेश आहे. थंडीमुळे फुलांची वाढ होत नाही, उत्पन्न कमी झाले आहे. तर दुसरीकडे लग्नसराई आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे शंभर टक्के मागणी वाढली आहे. बाजारात मात्र आवक होत नसल्याने सर्व प्रकारच्या फुलांचे दर कडाडले आहे. इतर वेळेच्या तुलनेत केवळ ४० टक्के फुलांची आवक होत आहे. त्यामुळे फुलांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. काही फुले तर बघावयासदेखील मिळत नाही.

यामुळे नागरिकांच्या खिशाला तर कात्री बसतच आहे. माळी, हार, फुलांचे बुके तयार करण्याच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. बहुतांशी वेळेस ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी त्यांना कमी दरांमध्ये फूल हार द्यावे लागत असल्याने नुकसानी सामोरे जावे लागत आहे. येत्या दिवसांमध्ये थंडीचे प्रमाण कमी झाले नाही तर दर आणखीनच वाढण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली.

या फुलांचे दर्शन दुर्लभ

थंडीमुळे फुलांची वाढ होत नाही. काही फुलांचे त्यामुळे उत्पादनही होत नाही. अशा फुलांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. मोगरा आणि गेलाड फुलांचा यात समावेश आहे. संपूर्ण शहराच्या बाजारात दैनंदिन मोगरा येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. सोमवारी (ता. २५) केवळ तीन किलो मोगरा फूल विक्रीस आले. त्यामुळे त्यांच्या दराने आकाश गाठले आहे. तर गेलाड फूल विक्रीस येत नसल्याचे बाजारात आढळून येत नाही.

''थंडीमुळे फुलांच्या व्यवसायावर प्रचंड परिणाम झाला आहे. मागणी वाढली आहे, आवक मात्र घटली आहे. त्यामुळे दरांमध्ये तिपटीने वाढ झाली आहे.''- भूषण कमोद, व्यावसायिक

असे आहे दर

फूल दर प्रमाण

झेंडू.............. ५०० ते ६००........कॅरेट

गुलाब............. ३० ते ६०..........बंडल

पॉलिहाऊस गुलाब.....२०० ते ३००.........बंडल

शेवंती.............१८० ते २२०.........किलो

मखमल.............. १३०............किलो

अष्टर.............. २००..............किलो

लिली.............४० ते ५०............ बंडल

निशिगंधा.............३२० ते ४००.........किलो

मोगरा.............१ हजार २००..........किलो

चाफा............. १० रुपयास......... १ फूल

जरबेरा.............८० ते १००............बंडल

ऑर्किड.............८०० ते ९०० कृपया....२० फूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT