onion esakal
नाशिक

साठवलेल्या कांद्याच्या वजनात घट

सरासरी उत्पन्न कमी होण्याची शेतकऱ्यांना भिती

अंबादास देवरे

सटाणा : बागलाण तालुक्यातील बहुतांश कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चढ्या दराच्या अपेक्षेने वर्षभरापासून हजारो क्विंटल उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे. आता त्या कांद्याचे वजन झपाट्याने घटत चालल्याने सरासरी उत्पन्नातही मोठी घट येत आहे. तर, पावसाळी लाल कांद्याची बाजारात मोठी आवक झाल्याने साठवलेल्या उन्हाळ कांद्याला अपेक्षेप्रमाणे भाव मिळणार नाही, या भितीने कांदा उत्पादक शेतकरी कमालीचा हवालदिल झाला आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात उन्हाळी कांदा पाच ते सात हजार प्रतिक्विंटल दराने विकला गेल्याने यावर्षीही कांद्याचा भाव सरासरी दहा हजार प्रतिक्विंटलपर्यंत जाईल, अशी भाबडी अपेक्षा असल्याने त्याच प्रतीक्षेत कांदा उत्पादक होते. मात्र, नेमके तसे होत नसल्याने कांदा उत्पादकांचा हिरमोड झाला आहे. नाईलाजास्तव मिळेल त्या भावाने प्रचंड तणावाखाली सर्व उत्पादक असून, केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा तीव्र निषेध केला जात आहे. उन्हाळी कांद्याचे काळे उळे (बियाणे) पेरा केल्यापासून एकूणच लागवड व आंतरमशागतीचा खर्च, रासायनिक खते फवारणी, कांदा काढणी ते बाजार समितीपर्यंत लिलावासाठी नेण्याचा वाहतूक खर्च हा किमान पाचशे ते सातशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत येतो. एवढे करूनही कांदा चाळ उभारणीसाठी शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत खर्च येतो. शासकीय अनुदान मिळाले नाही तर तोही भुर्दंड उत्पादकांनाच सहन करावा लागतो.

हमीभाव देण्याची मागणी

वर्षभर साठवून ठेवलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेत असतानाच पावसाळी लाल कांद्याची आवक वाढल्याने उन्हाळी कांदा बाजूला पडतो. या घटनाक्रमाला कांदा उत्पादक शेतकरी कंटाळले असून, शासनाने हमीभाव दिल्यास अशी वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही. अन्यथा, यापुढे उन्हाळी कांद्याला पर्यायी पिकाच्या शोधाशिवाय पर्याय उरणार नसल्याच्या प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Supreme Court Hearing: ठाकरे गटाची याचिका, निवडणूक आयोगावर सवाल अन् धनुष्यबाणाचा पेच; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या

RTI Penalty Vasai-Virar: वसई-विरार महापालिकेला ५० हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश; RTI अर्जदाराला मानसिक-आर्थिक त्रास

Marathi poetry translation in Mexico: मराठी काव्यानुवादाचा मेक्सिकोत डंका; डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या अनुवादित कविता ‘अल्किमिया देव रेलाम्पागो’मधून प्रकाशित

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर..

Viral Video : आजीचं स्वप्न नातीने केलं पूर्ण; पहिल्यांदाच विमानात बसवून नेलं गोव्याला, हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT