Work in progress of Punand Dam Water Scheme
Work in progress of Punand Dam Water Scheme esakal
नाशिक

Nashik : पुनंद धरण पाणी योजना कधी पूर्ण होणार? पाणीटंचाईमुळे शहरवासीयांमध्ये पालिका प्रशासनविरोधात नाराजी

अंबादास देवरे

Nashik : एप्रिल- मे महिन्यातील वाढत्या उन्हामुळे सटाणा शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यातच शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.

त्यामुळे पुनंद धरण पाणी योजना कधी पूर्ण होणार? याबाबत नागरिकांकडून विचारणा होत असून पाण्याअभावी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. (When Punand Dam water scheme will completed Displeasure against municipal administration among city dwellers due to water shortage Nashik news)

५५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पुनंद धरण पाणी योजना पूर्ण करून राज्यपालांच्या हस्ते योजनेचे जलपूजन होऊन येत्या १ मे रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. योजना पूर्ण केल्याचा श्रेयवादाचा पालिका राजकारणासाठी थेट वापर केला जात आहे.

मात्र योजना अपूर्णावस्थेत असून तांत्रिक बिघाडामुळे पुनंद धरणाचे पाणी या योजनेच्या सटाणा शहरातील जलकुंभातच पडत नसल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

त्यातच ठेंगोडा (ता.बागलाण) येथील गिरणा नदीपात्र कोरडेठाक पडल्याने जुन्या पाणीयोजनेच्या विंधन विहिरीने सुद्धा तळ गाठल्याने ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

दरवर्षी जानेवारी ते जून महिन्यापर्यंत शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शहराला आवर्तनाने चणकापूर व पुनंद (ता.कळवण) तर केळझर (ता.बागलाण) येथील गोपाळसागर धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

शहरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पुनंद पाणीपुरवठा मंजूर करून मार्गी लावली. जलपुजनाचा मोठा गाजावाजा केला गेला. मात्र आजही योजना अपूर्णावस्थेत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

यातच शहरातील नववसाहतींमधील काही भागात पाणी पोचत नसल्याने तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.

याबाबत पालिका प्रशासनाकडे काही नागरिकांनी विचारणा केली असता, पुनंद पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अर्जुनसागर (पुनंद) धरणातून पाणीपुरवठा होऊ शकत नाही तर काही ठिकाणी जलवाहिन्यांची सुरू असलेली गळती थांबविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या वर्षीही एप्रिल महिन्यातच शहरात पाणीटंचाई निर्माण झाली होती. पुनंद धरणातून फ्लोटिंगद्वारे पाणी उचलण्याची परवानगी मिळाल्याने सावकी फाट्याजवळ योजनेच्या जलवाहिनीस तात्पुरता टी बसवून ठेंगोडा पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीतून हे पाणी शहरातील मुख्य जलकुंभात टाकून वितरित करण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता.

तसेच ऐन उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईत केव्हाही हे फ्लोटिंगचे पाणी उचलता येणार होते. मात्र नव्या योजनेला बऱ्याच ठिकाणी होत असलेल्या पाणी गळतीचा अडसर तयार झाला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मार्च २०२३ अखेर पुनंद पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन नवीन जलवाहिन्यांतून शहराला समान दाबाने पुरेसा पाणीपुरवठा होईल ही शहरवासीयांची अपेक्षा फोल ठरल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मुदत संपूनही कामे अपूर्णच

पुनंद पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन पालिकेकडे हस्तांतरित करण्याची मुदत संपूनही योजनेची आनुषंगिक कामे अपूर्ण कशी ? या चर्चेला सध्या उधाण आले आहे. वर्ष उलटल्यानंतरही पुनंद योजनेचे काम अपूर्णच असून जलवाहिन्यातील गळतीमुळे फ्लोटिंग पंपाद्वारेही पाणी उचलून उपयोग होत नाही.

आता टंचाई काळात पाणीपुरवठ्यासाठी चणकापूर धरणाच्या आवर्तनाची वाट पाहणेच सटाणावासीयांच्या नशिबी आले आहे. पुनंद पाणीपुरवठा योजना नक्की कधी पूर्ण होईल? कधी आमच्या नळांना दररोज पूर्ण दाबाने पाणी येईल ? या यक्ष प्रश्र्न शहरवासीयांना सतावले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT