MP Harishchandra chavan esakal
नाशिक

Nashik News: तेव्हा गळ्यात कांदामाळ घालणारे, आत्ताचे लोकप्रतिनिधी गेले कुठे? माजी खासदार चव्हाण यांचा प्रश्न

सकाळ वृत्तसेवा

देवळा : कांदा निर्यातशुल्कप्रश्नी सरकारमध्ये असताना गळ्यात कांद्याची माळ घालून आंदोलन केले. निर्यातशूल्क शून्य करण्यास भाग पाडले होते. आज दुर्दैवाने तसे झाले नाही. यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे.

अशी स्थिती असताना मतदारसंघातील मंत्री कांदा व इतर शेतमाल भावप्रश्नी मूग गिळून बसले आहेत, अशी खंत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी गुरुवारी (ता. ५) येथे व्यक्त केली.

येथील देवळाभूमी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. (Where did current peoples representatives wore onion necklace around their necks Former MP Chavan question Nashik News)

श्री. चव्हाण म्हणाले, की दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा देशातील सर्वांत मोठा कांदा उत्पादक मतदारसंघ आहे. त्यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया दिल्लीपर्यंत पोहोचायलाच हव्यात.

शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात प्रोड्युसर हब झाल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल. या कंपन्यांना शेतकऱ्यांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. गेल्या काळात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे लुबाडले होते, ते मी परत करायला भाग पाडले होते.

पण तेव्हा कांद्याच्या माळा घालणारे आता सत्तेत बसले आहेत. मग सत्ता येताच कांदा प्रश्न संपला असे त्यांना वाटते का? की लोकांसाठी लढायचे नाही, असे त्यांनी ठरविले आहे. दरम्यान, प्रयोगशील शेतकऱ्यांचा माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, किशोर चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तालुका कृषी अधिकारी सीताराम चौधरी, निरंजन पाटील, गोपाल देशमुख, नगरसेवक संतोष शिंदे, बाजार समितीचे सचिव माणिकराव निकम, ॲड. मनोज शिंदे, समीर चव्हाण, निंबा निकम, पवन अहिरराव, धनंजय आहेर,

हर्षद मोरे, सुधीर मराठे, सुनील देवरे, राजेंद्र केदारे, पंडित पाटील, निंबा आहेर, दिलीप जोंधळे, भाऊसाहेब रौदळ, ग्यानदेव पगार, देवा भामरे, नाना मगर, दीपक जाधव, दुलाजी आहेर, वैजनाथ देवरे आदींसह शेतकरी उपस्थित होते. कंपनीचे अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT