pandharpur1.jpg 
नाशिक

लाखो वारकरी संभ्रमात...'माउली यंदा पंढरपूर वारीला बोलावणार का?'

सकाळवृत्तसेवा

नाशिक : पंढरपूरची वारी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. वर्षानुवर्षे पिढ्यान्‌पिढ्या महाराष्ट्रातील लाखो वारकरी कुटुंबे वारी करीत आली आहेत. मात्र यंदा कोरोनाच्या लॉकडाउनमुळे यंदा वारी होणार का, "माउली पंढरपूरला बोलावणार का?' ही लाखो वारकऱ्यांच्या मनातील भावना आहे. 

वारकरी समूहात संभ्रम

महाराष्ट्रातील वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. राज्यातील विविध भागांतून संतांच्या पालख्या पंढरपूरला निघतात. नाशिकहून संत श्रेष्ठ निवृृत्तिनाथ महाराजांची पालखी निघते. दर वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात निघणाऱ्या वारीची दीड-दोन महिने आधीपासूनच तयारी सुरू होते. वारीला कोणती बैलजोडी निवडायची, मानकरी कोण, अशा लहान-मोठ्या कामांची मे महिन्यापासून तयारी सुरू होते. मात्र यंदा 19 मेपर्यंत लॉकडाउन कायम आहे. त्यानंतर तो वाढणार की संपणार याविषयी संभ्रमावस्था आहे. अशा स्थितीत वारीची तयारी करावी की नाही, हा प्रश्‍न आहे. वारी निघणार असल्यास तयारी सुरू करावी लागणार. निघणार नसल्यास किमान चरणपादुका नेण्याची तरी व्यवस्था असावी या आणि अशा अनेक प्रश्‍नांविषयी वारकरी समूहात संभ्रम आहे. 

मुख्यमंत्र्यांना पत्र 

त्र्यंबकेश्‍वरहून निघणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखीतील सहभागी वारकऱ्यांना चरणपादुका तरी पंढरपूरला नेऊ देणार का, याविषयी शंका आहे. वारकरी मंडळींनी त्याविषयी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. शेकडो वर्षांची वारी परंपरा कायम राहावी, सोशल डिन्स्टन्सिंगचे नियम पाळून राज्यातील वारी परंपरा कायम ठेवण्याची मागणी आहे. राज्यातील सगळ्याच भागांतील वारकरी मंडळींची मागणी आहे. मात्र लांबून येत तीन-चार जिल्ह्यांतून महिनाभराचा प्रवास कराव्या लागणाऱ्या मोठ्या दिंड्यांची अवस्था जास्तच अडचणीची होणार आहे. 

राज्यातील सात मानाच्या पालख्या आहेत. त्यात संत ज्ञानेश्‍वरांचे थोरले बंधू व गुरू असलेल्या आद्यपीठ संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखीला पावणेदोनशे वर्षांपासून ही परंपरा आहे. सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियम, अटी पाळून परवानगी दिली गेली पाहिजे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करावा ही वारकरी मंडळींची अपेक्षा आहे. - हभप पुंडलिकराव थेटे (पालखीप्रमुख, संत निवृत्तिनाथ महाराज) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT