kill.jpg 
नाशिक

धक्कादायक! रागाच्या भरात 'त्याचे' हात देखील थरथरले नाही...बायकोला तर संपवलेच अन् मुलीलादेखील...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (जाखोरी) शनिवारी (ता. १३) मध्यरात्री झोपेत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन संशयित पतीने तिचा खून केल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आईच्या कुशीत झोपलेली सहा वर्षांची चिमुरडीही जखमी झाली असून तिच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

अशी आहे घटना

ज्योती उर्फ मिना शिवाजी माळी (२७) असे मयत विवाहितेचे नाव आहे. शिवाजी तुकाराम माळी (३०, रा. जाखोरी, ता.नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. शिवाजी तुकाराम माळी याचा पत्नीवर संशय होता. ज्योती रात्रीतून पळून जाईल असे त्याला वाटत होते. त्यामुळे, शनिवारी (ता. १३) रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याने घरामध्ये गाढ झोपेत असलेली पत्नी ज्योती हिच्या गळ्यावर कोयत्याने वार करीत तिचा निर्घृण खून केला. या घटनेत आईच्या कुशीत झोपलेली त्यांची सहा वर्षांची चिमुरडीच्या हातालाही गंभीर जखमी झाली. 

घटनेची माहिती मिळताच, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरज बिजली यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलीला बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संशयित पती शिवाजी माळी याने खुनाची कबुली दिली आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT