Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir esakal
नाशिक

Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर नटले; गोदाआरती, तर कुठे गीत रामायण

सकाळ वृत्तसेवा

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना रामलल्लाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर नटले आहे. महापालिकेकडून स्वच्छता मोहीम, तर सार्वजनिक मंडळांकडून सोमवारी (ता. २२) विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

चौक भगव्या पताकांनी सजले आहे. भजन, कीर्तन, गोदाआरती, गीत रामायण अशा कार्यक्रमांची रेलचेल सोमवारी दिसून येणार आहे. संपूर्ण शहर रामलल्लाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. (whole city turned out to welcome Ram Lalla ayodhya ram mandir nashik news)

- श्री काळाराम मंदिरात पहाटेपासून कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. महापूजेनंतर सकाळी साडेआठला भजन, कीर्तन होणार आहे. सायंकाळी सहाला दीपोत्सव होईल.

--------

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री काळाराम मंदिरात महाआरती होईल.

---

स्वागत यात्रा समितीतर्फे रविवार कारंजा सकाळी दहाला येथे १५ हजार लाडूंचे वाटप केले जाणार आहे.

----

महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानतर्फे सकाळी १० वाजता वेद मंत्र, रामरक्षा पठण होईल व कारसेवकांचा सत्कार होईल.

----

जुने नाशिकमधील आझाद चौक येथे सायंकाळी ६ वाजता नाशिक इस्कॉन प्रमुख धनराज प्रभूंचे व्याख्यान होईल.

---

मनसेतर्फे सकाळी ९.३० ला पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते काळाराम मंदिरात आरती होईल. शहरभरात ७०० किलोच्या ५१ हजार लाडूंचे वाटप होईल.

-----

देवळाली गावात राममंदिराची २० फूट बाय ३० फुटांची प्रतिकृती साकारली जाणार आहे.

------

जेल रोडला श्रीराम उत्सव समिती, शिवराज्याभिषेक समिती व परिसरातील विविध संस्थांतर्फे सामूहिक रामरक्षा पठण, महाआरती व राम गीतांचा कार्यक्रम होईल.

-----

मुक्तिधाम मंदिरात ९ ते १२ या कालावधीत पं. ओंकार वैरागकरांचा राम भजनांचा कार्यक्रम होईल. महाप्रसाद वाटप होईल.

----

गायत्री परिवारातर्फे सायंकाळी सहापासून गायत्री शक्तिपीठ, प्रज्ञापीठ, जनजागरण केंद्र व साधकांच्या घरोघरी दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.

-----

तुळजाभवानी मंदिर समितीतर्फे श्रीराम कथा आयोजित करण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी श्रीराम कथेत राम राज्याभिषेक होईल.

--

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे रामकुंड ते नारोशंकर मंदिरापर्यंत गोदाघाटावर सायंकाळी सहाला २५ हजार दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव होईल.

------

डीजीपीनगर येथील विघ्नहर गणेश मंदिरात सकाळी ९ ला माजी महापौर सतीश कुलकर्णी व संध्या कुलकर्णी यांच्यातर्फे गीत रामायण व श्रीराम गीत कार्यक्रम होईल.

--------

सिडको परिसरातील पवननगर मैदानात मुकेश शहाणे यांच्या वतीने ५१ फूट उंच श्रीराम देखावा साकारण्यात आला आहे. तसेच श्रीराम भजन कार्यक्रमाचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.

-----

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याची साफसफाई केली जाणार आहे.

---

मखमलाबाद येथील श्रीराम मंदिरात भव्य शोभायात्रा व महाप्रसादवाटप केले जाणार आहे.

-----

वीर सावरकर मित्रमंडळातर्फे सावरकरनगर येथील मधूर स्वीट चौकात अयोध्येतील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे.

--------

नाशिक रोड येथील दत्तमंदिर चौक येथे रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे.

---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT