Hair Transplant Failure
Hair Transplant Failure esakal
नाशिक

Hair Transplant Failure : केस प्रत्यारोपण फेल का होते?; जाणुन घ्या

सकाळ वृत्तसेवा

मागील दहा वर्षांचा अहवाल बघता आधी फक्त श्रीमंत, बिझनेसमन, क्रिकेटर्स, सिनेमातील हिरो यांचे यशस्वी केस प्रत्यारोपणाचे परिणाम बघून जनसामान्यांमध्ये टक्कलपणासाठी केस प्रत्यारोपण (हेअर ट्रान्सप्लान्ट) हे अतिशय लोकप्रिय झाले. पण, जशी या सर्जरीची लोकप्रियता वाढू लागली तसे यात अवैधपणे केस प्रत्यारोपण करणाऱ्या सेंटर्सचे प्रमाणही वाढू लागले. केस प्रत्यारोपण खरोखर कोणत्या डॉक्टरांकडे करावे, याबद्दल काही महत्त्वाच्या प्रश्नांची शहानिशा व खात्री करूनच केस प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेणे उचित ठरेल.

(Why does hair transplant fail find out Nashik News)

गेल्या काही वर्षांमध्ये अवैध केस प्रत्यारोपण सेंटर क्लिनिकमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जेथे शस्त्रक्रिया करणारा व्यक्ती क्वॉलिफाइड नसताना केस प्रत्यारोपणचा व्यवसाय करत आहे. त्यामुळे अपयशी केस प्रत्यारोपण यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे, ही अतिशय चिंतेची बाब आहे. कारण केस प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरचा अनुभव, त्याचे क्वॉलिफिकेशन, त्यात घेतली जाणारी काळजी ही एका यशस्वी हेअर ट्रान्सप्लान्टसाठी अत्यंत गरचेजी आहे.

मागील दहा वर्षांचा अहवाल बघता आधी फक्त श्रीमंत, बिझनेसमन, क्रिकेटर्स, सिनेमातील हिरो यांचे यशस्वी केस प्रत्यारोपणाचे परिणाम बघून जनसामान्यांमध्ये टक्कलपणासाठी केस प्रत्यारोपण (हेअर ट्रान्सप्लान्ट) हे अतिशय लोकप्रिय झाले. पण जशी या सर्जरीची लोकप्रियता वाढू लागली तसे यात अवैधपणे केस प्रत्यारोपण करणाऱ्या सेंटर्सचे प्रमाणही वाढू लागले. आज क्वॉलिफाइड सर्जनकडून करून घेतल्या जाणाऱ्या केस प्रत्यारोपण करणाऱ्यांची संख्या कमी दिसून येते.

आपले हेअर ट्रान्सप्लान्ट करणारे सर्जन हे क्वॉलिफाइड व अनुभवी आहेत का हे चेक करून घ्या, असे आपण पेपरमध्ये अथवा ऑनलाइन वाचले असेलच. भारतामध्ये असोसिएशन ऑफ हेअर रेस्टरेशन सर्जन ऑफ इंडिया (AHRS) नावाची अधिकृत संस्था असून, आपण केस प्रत्यारोपण करत असलेले डॉक्टर AHRS चे सदस्य आहे का? हे पडताळून पाहणेदेखील गरजेचे ठरते. केस प्रत्यारोपण या शस्त्रक्रियेचे दुष्परिणाम आज-काल वाढलेले दिसत आहेत, ते याच नॉनक्वॉलिफाइड व्यक्तींकडून केल्या जाणाऱ्या अनधिकृत केस प्रत्यारोपण सेंटरमुळेच.

याबाबी जाणून घेण्याची गरज

- केस प्रत्यारोपण करत असलेल्या डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता काय आहे व ते AHRS चे अधिकृत मेंबर आहेत का?

- केस प्रत्यारोपण हे OT सेटअपमध्ये होत आहे की कुठे अपार्टमेंटमध्ये किंवा एखाद्या रुममध्ये केले जात आहे.

- केस प्रत्यारोपणपूर्वी तुमची ॲलर्जी टेस्टिंग केली गेली का? तसेच ऑपरेशनदरम्यान तुमचे ब्लडप्रेशर, तसेच ऑक्सिजन सर्क्युलेशन, ब्लड, शुगर इत्यादी मॉनिटर केले जाते आहे का?

- केस प्रत्यारोपणआधी तुमची Tricosopy द्वारे केसांची गुणवत्ता तपासण्यात आली आहे का?

- तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर कन्सल्टिंग करत आहात ते स्वतः केस प्रत्यारोपण करणार आहेत की कोणीतरी दुसरे येऊन प्रोसिजर करणार आहे.

- तुम्ही केस प्रत्यारोपण डॉक्टर बेसड् क्लिनिकमध्ये करत आहात की एखाद्या चेन क्लिनिकमध्ये प्रत्यारोपण करीत आहात?

"केस प्रत्यारोपणासाठी वापरली जाणारी मशिनरी ही आधुनिक आहे की निकृष्ट दर्जाची उपकरणे वापरली जात आहे आदी प्रश्नांची शहानिशा व खात्री करूनच केस प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेणे उचित ठरेल."

- डॉ. मनोज बच्छाव, प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT