Dr. Satish Deshmukh Murder Case News esakal
नाशिक

Nashik Crime News : ‘त्या’ डॉक्टरचा उपचारादरम्यान मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : अनैतिक प्रेमसंबंधाला अडसर ठरणाऱ्या डॉक्टर पतीला धडा शिकवण्यासाठी त्याच्या दुसऱ्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हॉस्पिटलमध्येच डॉक्टरला भुलीचे इंजेक्शन देऊन ठार करण्याचा प्रयत्न केला होता. ३३ दिवसांपासून कोमात असलेल्या या डॉक्टरचा अखेर गुरुवारी (ता. १३) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

डॉ. सतीश केशवराव देशमुख (५९, रा. परीक्षित हॉस्पिटल, शिवाजीनगर, म्हसरूळ) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. तर, सुहासिनी देशमुख आणि अरुण कांडेकर अशी संशयितांची नावे आहेत. सध्या दोघेही फरार आहेत. त्यांच्यावर वाढीव कलम कोणते लागणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. (wife attempt to kill doctor husband for boyfriend case Death of doctor during treatment Nashik Latest Crime News)

म्हसरुळला परीक्षित हॉस्पिटल असून ते देशमुख यांचे खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयात डॉ. देशमुख यांची संशयित पत्नी सुहासिनी व तिचा प्रियकर अरुण कांडेकर हे १० सप्टेंबरला रुग्णालयात असताना डॉ. देशमुख यांनी दोघांचे प्रेमसंबंध समजल्याने बोलावून विचारणा केली. त्यानंतर तिघांत वाद झाले. यानंतर प्रियकर निघून गेला, तर दुसरी पत्नी सुहासिनी डॉक्टर पतीसमवेत रुग्णालयातील विश्रांती कक्षात गेली.

तिथे डॉक्टरांना तिने भुलीचे इंजेक्शन देत ठार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब डॉक्टरांनी मुलगा परिक्षितला सांगितल्यावर त्याने पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली होती. त्यानुसार म्हसरुळ पोलिसांत दोघांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. डॉ. देशमुख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान डॉक्टरांचा मृत्यू झाला. दरम्यान, याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून दाखल गुन्ह्यात वाढीव कलमांन्वये तपास केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: पानिपतकार विश्वास पाटील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

Kamshet News : कामशेतमध्ये महामार्गालगत कचऱ्याचे ढीग,दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; व्यवस्थापनाअभावी गंभीर परिस्थिती

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर सरकारमध्येच जुगलबंदी: भुजबळ-विखे पाटलांमध्ये मतभेद

Sangli Crime News : राजकीय स्वीय सहायकाचा त्रास, पंचायत समितीतील २७ वर्षीय अभियंत्याचा मृत्यू; कृष्णा नदीत मृतदेह सापडल्याने आरोप...

PCMC News : नवनगर विकास प्राधिकरणाच्या जमिनी द्या, पीएमआरडीएची मागणी; अतिक्रमणबाधितसह मोकळ्या जागा हव्यात

SCROLL FOR NEXT