Murder News esakal
नाशिक

Nashik Crime: श्रीभुवन येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घालत हत्या; पतीचीही आत्महत्या

रतन चौधरी

Nashik Crime: तालुक्यातील श्रीभुवन येथे पतीने पत्नी वर कुऱ्हाडीने वार करून निघृण हत्या करीत घरातून पळ काढत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत मयत आरोपीचा मुलगा लक्ष्मण दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे वडील मनोहर शिवाजी दळवी वय ५१, आई जयवंता मनोहर दळवी वय ४७ या पती- पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून नेहमीच वाद होत असत.

वडीलांना दारुचे व्यसन असल्याने दोघांमध्ये भांडण होत असे. एकमेकांना वारंवार शिवीगाळ करीत असत.

एक सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान आई चुलीवर स्वयंपाक करीत असतांना दोघांमध्ये भांडण झाले त्याच वेळी वडिलांनी घरातील कुऱ्हाडीने आईच्या मानेवर उजव्या बाजूला कुऱ्हाडीने वार करीत गंभीर जखमी केले.

जागेवरून पळ काढला. आई चुली जवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. चुली जवळ अक्षरश: रक्ताचा सडा पडला होता. (Wife axed to death due to suspicion of character in Sribhuvan husband committed suicide Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आईला तात्काळ सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालय केले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी मृत्य घोषित केले. याच दरम्यान वडिलांनी आमच्याच पायरीचा माळ या शेतात जाऊन भीती पोटी सादड्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पत्नी पत्नीवर एकाच चितेवर अग्नी डाग देण्याची वेळ कुटुंबावर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. संशयाची सुई पती पत्नीचा जीव घेई, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील आहेर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT