late Valmik and suspect Ishwar Thakur
late Valmik and suspect Ishwar Thakur esakal
नाशिक

Nashik Crime News : मुख्याध्यापकाकडून शालकाचा खून; नांदगाव येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : दारु पिऊन सासू सासऱ्यांना मारहाण करणाऱ्या शालकाला समजावून सांगण्यास गेलेल्या मुख्याध्यापक मेहूण्याने लोखंडी हातोडीने त्याच्या डोक्यात वार केल्याने शालकाचा मृत्यू झाल्याची घटना नांदगाव येथे घडली.

वाल्मीक साहेबराव ठाकूर (वय ३५) असे मृताचे नाव आहे. या घटनेने शहरात मात्र एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून संशयित मुख्याध्यापक ईश्‍वर ठाकूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. (wife brother killed by headmaster Incident at Nandgaon Nashik Crime News)

शहरातील आनंदवाडी भागात वाल्मीक साहेबराव ठाकुर (पवार) या युवकाची मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमाराला लोखंडी हातोडीने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना घडली. मयत वाल्मीक हा दारू पिऊन नेहमी आपल्या आई वडिलांना त्रास देत असे.

कैलासनगर येथे राहणारे मुख्याध्यापक ईश्वर देवराम ठाकूर (वय ४६) यांना याबाबत सासू सासरे यांनी कळविले असता या गोष्टीचा राग आल्याने ईश्‍वर ठाकूर यांनी शालकास मारहाणीचा जाब विचारला यात त्यांना राग अनावर झाल्याने त्यांनी वाल्मीक याच्या डोक्यात लोखंडी हातोडीने वार केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यात वर्मी वार डोक्यास लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि वाल्मीक यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच प्रदीप निवृत्ती ठाकूर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. नंतर श्‍वानास पाचारण करण्यात आले.

यावेळी मृतदेहाजवळ रक्ताने माखलेल्या हातोडीवरून श्‍वानाने संशयित ईश्वर देवराम ठाकूर यांच्याकडे रोख धरला. यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सुरवातीला खूनास नकार देणाऱ्या संशयित यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT