नाशिक

मुख्य अंकातील पानासाठी... अवतीभवती

CD
धुळे : मुख्य अंकातील पानासाठी... अवतीभवती -- ‘एसआरबी’मध्ये वन्यजीव सप्ताह धुळे : दहिवद (ता. शिरपूर) येथील एस. आर. बी. इंटरनॅशनल शाळेत नुकताच ‘वन्यजीव संरक्षण कार्यक्रम’ उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासन वनविभागातर्फे झालेल्या या सप्ताहानिमित्त शाळेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे विविध कार्यक्रम झाले. वनक्षेत्रपाल सुनील जोग यांनी वन्यजीव संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वन परिमंडल अधिकारी के. बी. धात्रक यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. वनरक्षक विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून निसर्ग व वन्यजीवाच्या रक्षणाची शपथ घेतली. अध्यक्ष डॉ. धीरज बाविस्कर यांनी वन्यजीवांचे महत्त्व आणि मानवाचे योगदान यावर मार्गदर्शन केले. वनरक्षक के. आय. साळुंखे, अनिल गायकवाड, रवींद्र शिंदे, मधुकर चौरे, अरुण पवार, मोनाली गजमल पाडवी यांच्यासह वन मजूर उपस्थित होते. अध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर, संचालिका मानसी बाविस्कर, मुख्याध्यापक सुभाषनाथ पटले, उपप्राथमिक मुख्याध्यापिका निवेदिता दुबे उपस्थित होते. सीमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यश्री पटले यांनी आभार मानले. -- वाघाडीत शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा धुळे : वाघाडी खुर्द (ता. शिंदखेडा) येथे आत्मा, कृषि विज्ञान केंद्र व तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण पार पडले. प्रकल्प संचालक सूरज जगताप व उपसंचालक प्रज्ञा पवार यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या कार्यक्रमास १२५ शेतकरी उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील यांनी कापूस व मका पिकातील गुलाबी बोंडअळी, लष्करी अळी नियंत्रण आणि एल निनोच्या प्रभावाखाली विद्राव्य खताच्या फवारणीबाबत मार्गदर्शन केले. सर्ग विकास समितीचे नितीन वारके यांनी देशी गोवंश आधारित जिवामृत व पंचगव्य निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक संदीप पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रशिक्षणानंतर शेतात पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक किरण देसले यांनी सूत्रसंचालन केले. -- पालेशा महाविद्यालयाचे वक्तृत्व स्पर्धेत यश धुळे : धुळे एज्युकेशन सोसायटी संचालित मा. ध. पालेशा वाणिज्य, कला व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय राष्ट्रपिता महात्मा गांधी वकृत्व स्पर्धेत यश संपादन केले आहे. झेड. बी. पाटील महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेत पालेशा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट वक्तृत्व सादर केले. स्पर्धेत एस.वाय.बी.कॉम. वर्गातील वैष्णवी अमर राणा हिने हिंदी भाषा गटातून वैयक्तिक द्वितीय क्रमांक पटकावला. तिला रोख पारितोषिक मिळाले. तसेच एस.वाय.बी.कॉम. वर्गातील सोनल सपकाळ हिने इंग्रजी भाषा गटातून वैयक्तिक उत्तेजनार्थ पहिले पारितोषिक पटकावले. विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर महाले, वादविवाद मंडळ प्रमुख प्रा. प्रशांत बडगुजर व डॉ. सुषमा सबनीस यांचे मार्गदर्शन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज शहर व परिसरातील कलाक्षेत्रावर शोककळा

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

Latest Marathi News Live Update: अजिंठा- अंधारी धरणात पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

Navratri 2026: ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरु; नऊ दिवसांच्या व्रतात काय करावे अन् काय टाळावे? जाणून घ्या नियम...

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT