नाशिक

वन्यजीव सप्ताहानिमित्त सायकल जनजागृती राईड उत्साहात

CD
फोटो : H31599 नाशिक : वन्यजीव सप्ताहानिमित्त जनजागृती सायकल राईडमध्ये सहभागी सायकलिस्ट. -- वन्यजीव सप्ताहानिमित्त जनजागृती सायकल राईड शंभर सायकलिस्ट सहभागी; पर्यावरण संवर्धनाचा संदेश नाशिक, ता. ७ : सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग आणि रॉयल रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून बुधवारी (ता. ७) सायकल जनजागृती राईडचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण, निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या राईडमध्ये सुमारे १०० सायकलिस्टांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळी ६.३० वाजता त्र्यंबक नाका येथील वनविभाग संकुलातून उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक रवींद्र भोगे, वृषाली गाढे, वनपरीक्षेत्र अधिकारी सविता पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काळे आणि डॉ. आबा पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून राईडचा शुभारंभ करण्यात आला. राईडचा मार्ग गडकरी चौक, मायको सर्कल, एबीबी सर्कल, भोसला मिलिटरी चौक, कॅनडा कॉर्नर, अशोकस्तंभ मार्गे पुन्हा वन विभाग संकुल असा होता. विशेष म्हणजे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनीही सायकलिस्टसोबत सायकल चालवत या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. राईडदरम्यान ‘पर्यावरण वाचवा, निसर्ग वाचवा, वन्यजीवांचे संरक्षण करा’ अशा जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या. शहरातील प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध पद्धतीने जाणाऱ्या सायकल राईडकडे नागरिक कुतूहलाने पाहत होते. राईडच्या सुरक्षेसाठी पुढे वनविभागाची पायलट व्हॅन, त्यामागे सायकलिस्ट आणि मागे ॲम्ब्युलन्स अशी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. राईडनंतर वनविभाग संकुलात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर सायकलिस्टांनी आनंद घेतला. सर्व सहभागी सायकलिस्टचे अशोक काळे यांनी स्वागत केले. डॉ. साहेबराव कासव यांनी आभार मानले. उपस्थित सर्व रायडर्सना वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आकर्षक टी- शर्ट देऊन गौरविण्यात आले.

Ladki Bahin Yojana : 'कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही केलं भाष्य

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

केस गळायला लागले, विग बनवून घेतले तरीही सोनाली बेंद्रेने ते घातलेच नाहीत, पण का? म्हणाली, 'बोलायला खूप सोपं वाटतं पण...

IND vs WI 2nd T20I: नितीश रेड्डी, प्रिन्स यादव IN, वैभव सूर्यवंशी बाकावरच; दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी Playing XI मध्ये सूचवला बदल

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल - राहुल गांधी

SCROLL FOR NEXT