नाशिक

वन्यजीव सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांकडून प्राणी-पक्ष्यांची माहिती

CD
NSK26H31683 जळगाव : डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात वन्यजीव सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध प्राणी-पक्ष्यांचे मुखवटे घालून साकारलेली रूपे. वन्यजीव सप्ताहानिमित्त अधिवासाबाबत जनजागृती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १० : डॉ. अविनाश आचार्य विद्यालयाच्या प्राथमिक विभागातर्फे १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी प्रेम, संवेदनशीलता निर्माण करण्यासोबतच वन्य प्राणी, पक्षी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जंगल व नैसर्गिक अधिवासाचे महत्त्व, पर्यावरणातील वन्यजीवांचे स्थान, अन्नसाखळी, राष्ट्रीय उद्याने आदी विषयांची माहिती देण्यात आली. तसेच वन्यजीव व राष्ट्रीय उद्यानांशी संबंधित माहितीपट दाखविण्यात आले. कार्यनुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी जंगली व पाळीव प्राणी, पक्षी, जलचर प्राणी आणि कीटक यांचे मुखवटे तयार केले. विद्यार्थ्यांनी ‘मी सिंह बोलतोय’, ‘मी पांडा बोलतोय’, ‘मी जिराफ बोलतोय’, ‘मी हत्ती बोलतोय’, ‘मी अस्वल बोलतोय’, तसेच मोर, फ्लेमिंगो, घुबड, पोपट, कासव, मासा व तारामासा यांची भूमिका साकारत संबंधित प्राण्यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध प्राणी-पक्ष्यांची माहिती दिली. मुख्याध्यापिका डॉ. रत्नमाला पाटील व समन्वयक छोटू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. ज्योत्स्ना हिवराळे, कल्याणी मुसळे व अश्विनी वाणी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''जमेल तसे जंतरमंतरवर या, पोलिसांनी अडवल तर...''; आंदोलनाची सूत्रे हाती घेताच अजिंक्य शिंदेची प्रतिक्रिया

Nana Patekar Death: गौरीमुळे मला अटक झाली, नानांनी सोडवून आणलं; शाहरुख खानने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा

सरपंच व्हायचंय! निवडणुकीसाठी पैसे नाहीत, लिव्ह इन पार्टनरच्या घरी केली चोरी; २५ वर्षीय तरुणाला अटक

Marathi News Live Updates : अभिजीत दीपकेंना आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जाण्याची परवानगी

Aashna Choudhary IPS Success Story : कोणतीही कोचिंग नाही, तरीही मारली बाजी! यूपीएससीच्या प्रवासात चुका सुधारत कशी बनली तरुणी आयपीएस अधिकारी?

SCROLL FOR NEXT