Will all the corporators of Trimbakeshwar be disqualified nashik marathi news
Will all the corporators of Trimbakeshwar be disqualified nashik marathi news 
नाशिक

त्र्यंबकेश्‍वरचे सगळे नगरसेवक अपात्र ठरणार? काय आहे प्रकरण...वाचा सविस्तर..

सकाळवृत्तसेवा

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असून, यात अनेक नगरसेवकांनी अतिक्रमण केले आहे. अनेकांनी  अतिक्रमणांना पाठबळ दिले आहे. नगरसेवकांच्या अतिक्रमणाविरोधात पाच ते सहा वर्षांपासून श्री. पाठक तक्रारी करीत  आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर दाद मिळत नसल्याची तक्रार करीत त्यांनी न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. दरम्यान, त्यांच्या अतिक्रमण असलेल्या नगरसेवकांना कायमस्वरूपी अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी येत्या गुरुवारी (ता. २०) सुनावणी होणार आहे. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी सुनावणी घेणार असून, नुकत्याच सगळ्यांना सुनावणीसाठी नोटिसा  बजावल्या आहेत.

नगराध्यक्ष लोहगावकर, नगरसेवक कौलास चोथे, भारती बदादे, विष्णू दोबाडे, सायली शिखरे, अशोक घागरे, त्रिवेणी तुंगार, कल्पना लहांगे, दीपक गिते, अनिता बागूल, स्वप्नील शेलार, सागर उजे, माधवी भुजंग, शीतल उगले, संगीता भांगरे, शिल्पा नारायणे, समीर पाटणकर, मंगला आराधी यांच्यासह मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

गुरुवारी (ता. २०) सकाळी सुनावणी

त्र्यंबकेश्‍वर शहरातील अतिक्रमणांचा मुद्दा अनेक दिवसांपासून गाजत आहे. सिंहस्थ कुंभमेळा, पुरामुळे शहरात पाणी साचणे यांसारखे तत्कालीन विषय चर्चेत आल्यानंतर हा विषय चर्चेत येतो. त्यानंतर पुन्हा चर्चा विरते. याप्रकरणी महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिकनगरी अधिनियम १९६५ कलम ४४ नुसार अतिक्रमण असलेल्या नगरसेवकांना कायमस्वरूपी अपात्र ठरविले जावे, अशी पाठक यांची मागणी आहे. त्याबाबत गुरुवारी (ता. २०) सकाळी अकराला जिल्हाधिकारी कार्यालयातील पालिका शाखेत सकाळी अकराला सुनावणी होणार आहे

संपादन - विनोद बेदरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT