MLA Devyani Pharande Sakal
नाशिक

स्मार्टसिटीच्या नावाखाली गैरसोय होऊ देणार नाही - आमदार फरांदे

विक्रांत मते

नाशिक : शहरातील गावठाणात स्मार्टसिटींतर्गत (Smart City) सुरू असलेल्या विविध कामांमुळे नागरिकांसह व्यावसायिकांची गैरसोय होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार प्रा. देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) यांनी दहीपूल परिसरात कामांची पाहणी केली. या वेळी स्मार्टसिटीच्या नावाखाली नाशिककरांची गैरसोय होऊ देणार नसल्याचे आश्‍वासन व्यावसायिकांना दिले. (Will not allow inconvenience in the name of smart city says mla pharande)


मेन रोड व दहीपूल परिसरात रस्ते नूतनीकरण, भूमिगत गटार, पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. कामे करताना नागरिक, लोकप्रतिनिधींना विचारात घेतले गेले नसल्याने या संदर्भात प्रा. फरांदे यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या. या पार्श्‍वभूमीवर महापालिका, स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रा. फरांदे यांनी पाहणी केली. कामामुळे दहीपूल परिसरातील दुकाने रस्त्याच्या उंचीपासून एक मीटर खाली जाणार आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या व्यावसायिकांचे नुकसान होणार असल्याचे मत व्यक्त केले. गावठाणात क्लस्टर विकसित करण्यासाठी चार एफएसआयचा प्रस्ताव आहे. त्यामुळे स्मार्टसिटींतर्गत विकासकामांवर होणारा खर्च वाया जाण्याचा धोका असल्याचे मत व्यक्त केले. पुराचा धोकादेखील वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. या वेळी शहर अभियंता संजय घुगे, कार्यकारी अभियंता संजय बच्छाव, नगरसेवक अजिंक्य साने, माजी नगरसेवक हरिभाऊ लोणारी आदी उपस्थित होते.



गावठाण क्लस्टर विकसित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव आहे. क्लस्टरला परवानगी मिळाल्यास मोठ्या प्रमाणात झालेला खर्च वाया जाईल. कामांमुळे नाशिककरांचे नुकसान होऊ देणार नाही.
-प्रा. देवयानी फरांदे, आमदार


(Will not allow inconvenience in the name of smart city says mla pharande)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alcohol Limit Act: पार्टीत अडचण नको! घरी किती मद्य ठेवणे कायदेशीर आहे? नववर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वी नियम जाणून घ्या

Municipal Council Election: गड राखला; पण नगराध्यक्ष गमावला! भाजपला उरण नगर परिषदेतील सत्ता राखण्यात यश

सचिन पिळगांवकरांना सुद्धा लागलं FA9LA गाण्याचं वेड, सुप्रियासोबत केला भन्नाट डान्स, viral video

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजला- चंद्रशेखर बावनकुळे

Ichalkaranji Muncipal : इचलकरंजीत भाजपची कसोटी; नवे-जुने संघर्षामुळे निवडणूक रंगात

SCROLL FOR NEXT