crime.jpg 
नाशिक

'तू काळजी नको रे करु, तुझं काम असं झटक्यात करतो'...अन् केलं काही भलतंच

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (इगतपुरी) वाइन शॉपचे लायसन्स भाडेतत्त्वावर मिळून देतो, असे सांगून शहरातील एका तरुणाची 13 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी संशयित आरोपीला इगतपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.

अशी आहे घटना
 

गणेश परदेशी (वय 26, रा. शनी चौक, महादेव मंदिर, इगतपुरी) या तरुणाला वाइन शॉपचे लायसन्स भाडेतत्त्वावर मिळवून देतो, असे संशयित आरोपी जगन नारखेडे (रा. भालेगाव, ता. मलकापूर जि. बुलडाणा) याने सांगितले. दरम्यान, संशयिताने 30 ऑक्‍टोबर 2019 ते 16 मार्च 2020 पर्यंत टप्प्याटप्प्याने पाच महिन्यांत 13 लाख 10 हजार रुपये तरुणाकडून उकळले. दरम्यान, संशयित नारखेडे याने या तरुणाला बनावट लायसन्स दिल्याने हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. बनावट लायसन्स पाहून तरुणाला चांगलाच धक्का बसला. त्याने कुटुंबीयांना सोबत घेत इगतपुरी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 16) तक्रार दाखल केली. त्यानंतर काही तासांतच आरोपीला इगतपुरी पोलिसांनी गजाआड केले. 

या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गर्शनाखी पोलिस शिपाई मारुती बोराडे, सचिन देसले, विनोद गोसावी, वैभव वाणी तपास करत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT