नाशिक

‘झिरो डिग्री’ जॅकेट ते क्लासी बुट्सपर्यंत हिवाळी फॅशन

CD
एन्कर उबदारपणासोबत स्टायलिश लूकचा मेळ; हिवाळी फॅशनचे नवे ट्रेंड्स जेन झीमध्ये विंटेज लेदर जॅकेट्स, तर महिलांमध्ये लाँग ओव्हरकोट्सची चलती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : थंडीला सुरवात होताच फॅशन जगतात नव्या आणि आकर्षक ट्रेंडसची चलती पाहायला मिळते. यावर्षीच्या हिवाळी फॅशनमध्ये उबदारपणा आणि स्टायलिश लूकचा मेळ घालण्यात आला आहे. थंडीचा सामना करण्यासाठी बाजारात ‘झिरो डिग्री’ जॅकेट्स आणि हेवी इन्सुलेटेड पफर्स तरुणाईचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. ही जॅकेट अतिथंडीतही पूर्ण शरीराला उबदार ठेवून अगदी कूल आणि ट्रेंडी लूक देतात. फूटवेअरच्या बाबतीत यंदा, महिला आणि पुरुष दोघांमध्येही चंकी बूट्स, लेदर अँकल बुट्स आणि कॉम्बॅट बुट्सची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. लॉन्ग ओव्हरकोट, बॉम्बर जॅकेट्स, बॅगी जीन्ससोबत हे बुट्स परिधान केल्यास मॉडर्न लुक मिळतो. जेन झी वर्गामध्ये ओव्हरसाईज्ड विंटेज लेदर जॅकेट्स, ब्राइट निटवेर आणि फनेल-नेक जॅकेट्सची फॅशन सर्वाधिक इन आहे. तरुण पिढी रंगांच्या बाबतीत थोडे प्रयोग करतांना दिसते. त्यात पेस्टल शेड्ससोबत व्हायब्रंट कलरचे मफलर्स आणि बीनी कॅप्स त्यांना अधिक भावत आहेत. महिलांसाठी हिवाळ्यात लाँग वुलन कोट्स, चेक पॅटर्न ओव्हरकोट, टर्टलनेक स्वेटर्स आणि मऊ लेयरिंगचे विविध प्रकार विशेष पसंतीस उतरत आहेत. एथनिक वेअरमध्ये लोकर आणि पश्मीना शालची जादू कायम आहे. दुसरीकडे, पुरुषांसाठी मिनिमलिस्ट जॅकेट्स, लेअर्ड हुडीज, ट्रॅडिशनल बॉम्बर जॅकेटस ट्रेन्डी आऊटफीट पुरुषांसाठी उपलब्ध आहेत. एकूणच, यंदाची हिवाळी फॅशन कम्फर्ट, वॉर्म आणि फॅशनचे उत्तम संतुलन साधणारी ठरत आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी यात काहीतरी खास नवीन प्रयोग पाहायला मिळत आहेत. -- कोट हातमोज्यांपासून, पायातील माेजे, बुटीक, थर्मल, जॅकेटस, कानटोपी, स्कार्प यासारखे असंख्य प्रकार हिवाळी फॅशनसाठी उपलब्ध झाले असून दरवर्षी फॅशन ट्रेंडनुसार डिझाईन्समध्ये बदल केले जातात. त्यानुसार या सर्व प्रकारांमधील फॅशनमध्ये बदल करण्यात आले आहेत. -मिहिर शहा, रिंकू एनक्स, मेनरोड -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

Spine Surgery: जन्माची वाट न पाहता आईच्या गर्भातच बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; AIIMSच्या डॉक्टरांनी रचला इतिहास

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

Latest Marathi News Update : राज्यातील दुष्काळमुक्तीसाठी सरकारचा व्यापक कृती आराखडा; खाणींतील पाणी शेतीसाठी वापरणार, १५ लाख शेतकऱ्यांना 'फार्मर आयडी'चा लाभ - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT