Grapes esakal
नाशिक

Winter Season : घसरत्या तापमानाने द्राक्षबागांना धोका! कसबेसुकेणे परिसरात पारा 5 अंशाच्या घरात

सकाळ वृत्तसेवा

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : परिसरात गेल्या तीन ते चार दिवसापासून तापमानात कमालीची घट झाली असून आज ५.२ एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे परिसरातील द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत.

परिसरात मोठ्या प्रमाणात काळ्या जातीच्या द्राक्षबागा असून या द्राक्षबागांमध्ये पाणी उतरण्यास सुरुवात झाली आहे. (Winter Season Falling temperatures threaten vineyards In Kasbesukene area mercury 5 degrees nashik news)

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

पारा मोठ्या प्रमाणात घसरल्याने द्राक्षबागांच्या मण्यांना तडे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. घसरत्या तापमानामुळे द्राक्षबागांचे संरक्षण करण्यासाठी विशिष्ट औषधांची फवारणी करणे, रात्रीच्या वेळी ठिबक सिंचनाद्वारे बागेला पाणी देणे, मोकळ्या वाफेंमधून पाणी भरणे, द्राक्ष घडाभोवती कागद गुंडाळणे, प्रसंगी द्राक्ष बागांमध्ये भुसा पेटवून धूर तयार करणे आदी उपाययोजना करत आहेत.

चालू वर्षे द्राक्षबागांसाठी अनुकूल हवामान असल्याने आतापर्यंत द्राक्षबागांची स्थिती उत्तम आहे, मात्र वाढलेली थंडी शेतकऱ्यांना धडकी भरवत आहे. पारा मोठ्या प्रमाणात खाली घसरू नये अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात काळे फिल्म, शरद शिडलेस, जम्बो, मामा जम्बो, नानासाहेब पर्पल, काळी सोनाका आदी द्राक्ष लावण्यात आले आहेत.

या द्राक्षबागांची छाटणी लवकर करावी लागत असल्याने या द्राक्षबागाा लवकरच विक्रीसाठी सज्ज होत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांवर खर्च केल्याने शेवटच्या टप्प्यात वाढत्या थंडीमुळे मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Politics : गोकुळ दूध संघाकडून शौमिका महाडिकांचे आरोप खोडून काढले, प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती

कोण आहे राकेश किशोर? वय ७२, म्हणे,'पश्चाताप नाही, मी तुरुंगात जाणं चांगलं'

Latest Marathi News Live Update : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लवकरच होणार घोषणा, प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु

Nagpur Cough Syrup Death : विषारी कफ सिरपमुळे नागपुरात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, देशभरात मृतांचा आकडा १५ वर, प्रशासन अ‍ॅक्शनमोडवर...

ChatGPT Misuse : मित्राची वर्गातच हत्या कशी करायची? 'चॅटजीपीटी'ला विचारला प्रश्न, विद्यार्थ्याला खावी लागली तुरुंगाची हवा

SCROLL FOR NEXT