थंडी वाढताच स्कीन केअर उत्पादनांची वाढली मागणी
योग्य उत्पादन निवडल्यास हिवाळ्यात त्वचा राहते टवटवीत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : शहरात गुलाबी थंडीचे आगमन होताच हवेतील कोरडेपणा वाढू लागला आहे. याचा थेट परिणाम त्वचेवर होत असल्याने त्वचा रुक्ष आणि कोरडी होते. हिवाळ्यात त्वचा निरोगी व मऊ ठेवण्यासाठी कोल्ड क्रीम, मॉइश्चरायझर्स आणि बॉडी लोशन्सच्या खरेदीत मोठी वाढ झाली असून, बाजारात विविध प्रकारच्या उत्पादनांना प्रचंड मागणी वाढली आहे. मात्र, बदलत्या ऋतूत त्वचेचा पोत ओळखून योग्य उत्पादनांची निवड करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचा सल्ला तज्ञ मंडळी देतात.
बाजारात त्वचेशी निगडित असंख्य उत्पादने उपलब्ध असतात. त्यानुसार प्रत्येकाचा त्वचेचा पोत वेगवेगळा असल्याने त्यातून त्वचेसाठी योग्य उत्पादन निवडणे सर्वांना शक्य होत नाही. सौंदर्य प्रसाधनाची प्रत्येक उत्पादन हे भारतीय हवामान लक्षात घेऊन विशिष्ट घटकांपासून तयार केले जातात. कोणतेही उत्पादन वापरले तर, त्याचा परिणाम हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते आणि ऋतूही नकोसा वाटायला लागतो. त्यासाठी उत्पादनाची निवड कशी करावी तर, कोरड्या त्वचेसाठी शिया बटर, कोको बटर असलेले कोल्ड क्रीम आणि डीप मॉइश्चरायझिंग लोशन्स उत्तम पर्याय ठरतात. तेलकट त्वचा असल्यास जेल-बेस किंवा ऑईल-फ्री लाईट मॉइश्चरायझर्स अधिक योग्य ठरतात. सामान्य व मिश्र त्वचा असल्यास वॉटर-बेस्ड किंवा मध्यम मॉइश्चरायझिंग लोशन्स उत्तम ठरतात. अतिसंवेदनशील त्वचा असल्यास (मेडिकेयर प्रॉडक्ट) सुगंधित नसलेली आणि पॅराबेन-मुक्त सौम्य उत्पादने योग्य ठरतात.
--चौकट
क्रीमचा योग्य वापर कसा करावा?
ओल्या त्वचेवर क्रीम लावल्यास त्याचा अधिक परिणाम होतो. आंघोळ केल्यानंतर किंवा हात-पाय धुतल्यानंतर त्वचा हलकी ओलसर असतांना (३ मिनिटांच्या आत) लोशन लावल्यास त्वचेतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. अतिप्रमाणात क्रीम लावल्यास त्वचा तेलकट आणि धुळीमुळे त्वचेची छिद्रे बंद होतात. रात्री झोपण्यापूर्वी हात, पाय आणि चेहऱ्यावर क्रीम लावल्यास रात्रीतून त्वचेचे पुनरुज्जीवन उत्तम प्रकारे होते.
--- कोट
आकर्षक जाहिराती पाहून उत्पादने खरेदी करणे टाळावे, त्वचेच्या गरजेनुसार योग्य घटक असलेले लोशन निवडल्यास हिवाळ्यातही त्वचा चमकदार व टवटवीत राहते.
-आश्र्विनी कुमावत, ब्युटीशियन
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.