Igatpuri: At present cloudy weather in the taluka is threatening to affect crops due to spread of fog in the area
Igatpuri: At present cloudy weather in the taluka is threatening to affect crops due to spread of fog in the area esakal
नाशिक

Winter Update : इगतपुरी तालुक्यात थंडीबरोबरच ढगाळ वातावरण

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : तालुक्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असून, काल मंगळवार व आज बुधवार या दोन्ही दिवशी दिवसभर ढगाळ वातावरणाने तालुक्यात मांडव धरला.

त्यामुळे सूर्यनारायणाचे दर्शनही दुर्लभ झाले. विशेष म्हणजे दोन दिवसांपासून किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही घसरण झाली असून, शीतलहरींमुळे दिवसाही नागरिकांना गारव्याचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे अनेकांनी दिवसा स्वेटरचा, तर रात्री शेकोटीचा आधार घेतला. हिवाळा डिसेंबरनंतर सुरू झाला असला तरी जानेवारीत बोचऱ्या थंडीचा अनुभव इगतपुरीकरांना येत आहे. दोन दिवसांपासून वाढलेल्या बोचऱ्या थंडीमुळे घोटी-इगतपुरीकर गारठत आहेत. (Winter Update Cold and cloudy weather in Igatpuri taluka Nashik News)

इगतपुरी तालुक्यात सलग दोन दिवस तापमान कमी नोंदविले गेले. त्यामुळे सकाळी थंडीचा कडाका जाणवत असला तरी दिवसाही शीतलहरींमुळे वातावरणात गारवा जाणवत आहे. उत्तर भारतात झालेल्‍या बर्फवृष्टीमुळे आपल्याकडेही तापमानात घसरण सुरू आहे.

रब्बी पिकांना धोका : तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची अल्प का होईना लागवड करण्यात आली आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवर विविध रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यातच ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने खरिपाची वाट लागली होती.

रब्बीवरही ढगाळ वातावरणामुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव होत असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. यंदा शेतकऱ्यांनी मशागती करून रब्बीची पेरणी सुरू केली. पाण्याची उपलब्धता असल्याने कांदा, गहू, मसूर, हरभरा यांसह विविध भाजीपाल्याची लागवड केली. मात्र ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे.

....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

कसारा घाटात धुके : सध्या सकाळ आणि सायंकाळी तापमानात घट होत असून, रात्रीचा गारवा वाढणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या आसपास आले आहे. नाशिक, नगर, महाबळेश्वर आदी ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या खाली, तर पुणे, कोल्हापूर, सोलापूरला किमान तापमान सरासरीच्या आसपास आहे.

यंदा इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने थंडीच्या विक्रमाबरोबरच थंडीचा मुक्कामही वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात बोचऱ्या थंडीमुळे कसारा घाट परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. यामुळे सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग असूनही तो धुक्यामुळे मंदावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT