winter health update
winter health update esakal
नाशिक

Nashik News : सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत गारठा कायम असल्याने वाढ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरासह जिल्ह्यात गारठा कायम असून, थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला असला, तरी सोमवारपासून वेगाने घसरणारा पारा गुरुवारी (ता.१२) ९.२ अंश सेल्सिसवर स्थिरावला आहे.

शीतलहरींच्या प्रभावामुळे वातावरणातील गारठा कायम असून, रात्रीच्या सुमारास त्यात आणखी वाढ होत आहे. थंडीमुळे सर्दी, खोकल्यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याचे बघावयास मिळत आहे. (Winter Update Patients with cold cough Increase due to persistent hal Nashik News)

काही दिवसांपासून हवेत गारठा असल्याने सकाळी नऊपर्यंत घराबाहेर निघणे कठीण झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यातच सोमवारी (ता.१०) पुन्हा पारा खाली गेल्याने हुडहुडी भरली होती. सकाळच्या सुमारास थंड वाऱ्यांमुळे दिवसाही नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीत वाढ होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला असला तरी, तापमानात घसरण होत आहे.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

नाशिकमध्ये गुरुवारी ९.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. पार घसरत असला तरी, हवेतील गारवा कायम आहे. जिल्ह्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला यंदाच्या हंगामातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद झाली असूनही तेथील पारा ५.५ अंशावर पारा ‘जैसे थे’ आहे.

यामुळे थंडीची सुरवात झाल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये बोचऱ्या थंडीचा अनुभव नाशिककरांनी घेतला. हवेत गारवा असल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. दिवसाही असलेल्या शीतलहरींमुळे वातावरणात गारवा जाणवत आहे, शिवाय शहरासह जिल्ह्याचे तापमान घसरले असून, बोचऱ्या थंडीचा अनुभव नाशिककरांना मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशकात खळबळ! 26 कोटी रुपये रोख अन् 90 कोटी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रे जप्त!

World Archery Championships : ज्योती-परनीत-आदितीची सुवर्ण हॅट्‌ट्रिक;विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत सलग तिसरे विजेतेपद

KKR vs SRH Final LIVE Score : आयपीएलचा किंग कोण? 'गंभीर'च्या कोलकातासमोर हैदराबादचे कडवे आव्हान

Nitin Gadkari: नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शाह, फडणवीसांनी आखला होता डाव? राजकारणातील खळबळजनक दावा!

All We Imagine as Light: 'ऑल वी इमॅजिन अॅज लाईट' चित्रपटानं रचला इतिहास; जिंकला ग्रँड प्रिक्स पुरस्कार

SCROLL FOR NEXT