Winter Weather esakal
नाशिक

Winter Weather : फेब्रुवारी महिन्यात October Heat! दिवसा उन्‍हाच्‍या झळा अन् रात्री गारठा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वातावरणातून थंडी गायब झालेली असताना गेल्‍या दोन दिवसांपासून पुन्‍हा शीतलहरी वाहू लागल्‍या आहेत. दिवसा उन्‍हाच्‍या झळांचा सामना करावा लागत असताना, सायंकाळनंतर गारठ्याची अनुभूती नाशिककरांना आली.

बुधवारी (ता. १५) नाशिकचे किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३३. ५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. (Winter Weather October Heat in February Sunshine during day and cold at night nashik news)

जानेवारी अखेरीपर्यंत वातावरणात गारवा टिकून होता. नाशिकचे किमान तापमान सहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेले होते. परंतु गेल्‍या आठवड्याभरापासून वातावरणातून गारवा गायब झालेला होता.

दिवसाच्‍या वेळी उन्‍हाच्‍या तीव्र झळांचा जनजीवनावर परिणाम झालेला होता. आठवड्याभरापासून सरासरी किमान तापमान १३ ते १४ अंश सेल्सिअस राहात होते. तर , कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसवर पोचले होते.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

परंतु गेल्‍या दोन दिवसांपासून पारा घसरलेला असून, यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता. बुधवारी नाशिकचे किमान तापमान पुन्‍हा दहा अंश सेल्सिअसपेक्षा घसरले. कमाल तापमान मात्र अद्यापही ३३ अंशाहून अधिक राहाते आहे.

पुढील काही दिवस दिवसाच्‍या वेळी कडक ऊन तर सायंकाळनंतर वातावरणात गारठा असे मिश्र स्वरूपाचे वातावरण राहाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thar Accident सोमवारी पुण्याहून कोकणात जायला निघाले, गुरुवारी ताम्हिणी घाटातल्या दरीत थारसह ६ मृतदेह दिसले; कधी आणि काय घडलं?

भारतीय जवानाचं शिरच्छेद करून मुशर्रफसमोर ठेवलं, काय आहे किस्सा? ‘धुरंदर’मध्ये अर्जुन रामपाल साकारणार त्या राक्षसाचा चेहरा

Chief Minister Security : कोणत्या मुख्यमंत्र्यांना आहे जबरदस्त सुरक्षा कवच अन् जाणून घ्या, नितीश कुमारांची सुरक्षा कशी?

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात मोटार खोल दरीत कोसळली, चार मृतदेह हाती; मृतांची नावे समोर, सर्वजण पुण्यातील

Latest Marathi News Update LIVE : पुण्यात १ लाख रुपयांचा नायलॉन मांजा जप्त

SCROLL FOR NEXT