MSEDCL  esaka
नाशिक

नाशिक : वीज बंद केल्याने वायरमनला मारहाण

प्रतीक जोशी

वणी (जि. नाशिक) : बोपेगाव (ता. दिंडोरी) शिवारात वीजबिलांची वसुली करताना विद्युत जनित्रावरील ( Electric generator) एक वाहिनी बंद करुन ठेवल्याची कुरापत काढून विकास खराटे या वायरमनला शिविगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी बोपेगावच्या शेतकऱ्यावर सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोपेगाव शिवारात मंगळवारी (ता.१५) सकाळी साडे दहा ते साडे बाराच्या दरम्यान वरिष्ठांनी सांगितल्यानुसार वरिष्ठ तंत्रज्ञ विकास लक्ष्मण खराटे हे वीज ग्राहकांकडून वीजबील वसुलीचे काम करत असताना संजय श्रीराम कावळे (रा. बोपेगाव, ता. दिंडोरी) यांनी बोपेगाव शिवारातील डिपी क्रमांक २५५०८९३ वरील एक फेज बंद करण्याच्या कारणावरुन कुरापत काढली. श्री. खराटे यांना वीजबील वसुलीच्या कामात अडथळा आणून श्री. कावळे यांनी विद्युत जनित्रावरील बंद केलेला फेज चालू करण्यास भाग पाडले. शिविगाळ करीत श्री. खराटे यांच्या श्रीमुखात भडकावून पाठिवर खुर्ची मारली. श्री. कावळे यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची फिर्याद वायरमन (Wireman) विकास खराटे यांनी वणी (Vani) दिली असून पोलिसांनी मंगळवारी रात्री साडे आठच्या दरम्यान संजय कावळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT