A bonfire lit in a vineyard to protect against the cold.
A bonfire lit in a vineyard to protect against the cold. esakal
नाशिक

Nashik News : द्राक्षबागा वाचविण्यासाठी बळीराजांची धावपळ; ठिबकद्वारे पाणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया समजला जाणाऱ्या निफाड तालुक्यात तापमानाचा पारा घसरल्याने द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेकोटी पेटवण्यास सुरवात झाली आहे.

मागील दोन-तीन दिवसांत निफाड तालुक्यात तापमानात घट झाल्याने द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ दिसत आहे. (With down in temperature farmers are seen worried to save vineyards in sinnar nashik news)

नाशिक जिल्ह्यात नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये सामान्य थंडी होती. गेल्या तीन दिवसांपासून तापमानात घसरण झाली आहे. थंडीमुळे तयार द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता जास्त आहे. कडाकाच्या थंडीपासून द्राक्षबागा वाचविण्याससाठी पहाटे ठिबकद्वारे विहिरीचे पाणी देणे व शेकोटी पेटवून धूर करून ऊब देणे, असे प्रकार शेतकऱ्यांना करावे लागत आहेत.

द्राक्षाबरोबर कांदापातीवर करप्याचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. त्यामुळे कांद्याची वाढ खुंटते. पहाटे पडणारे धुके व दवांमुळे कांदा पिकाचे नुकसान होत आहे. गहू, हरभरऱ्यासाठी पोषक वातावरण असले, तरी सध्याच्या वातावरणाचा द्राक्ष फुगवणीवर परिणाम होऊ शकतो.

''सध्या निफाड तालुक्यात दिवसा कडक ऊन व रात्री थंडी, असे वातावरण आहे. रात्री थंडीचे प्रमाण वाढते. पहाटे पडणारे दव, धुके व थंडीचा फटका द्राक्षबागेला बसत आहे. द्राक्षमण्यांच्या फुगवणीवर विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे द्राक्षबागा वाचविण्यासाठी बळीराजाची धावपळ होत आहे.''-सुनील गवळी, ब्राह्मणगाव विंचूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT