helmet esakal
नाशिक

नाशिक : हेल्मेट नसल्यास दुचाकीचालकांची होणार परीक्षा

पोलिस आयुक्त पांडे यांचे नवीन फर्मान; आजपासून कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात विनाहेल्मेट दुचाकी चालविताना पोलिसांनी पकडल्यास दुचाकीचालकांची परीक्षा घेण्यात येणार आहे. बुधवार (ता.१) पासून या आदेशाची अंमलबजावणी वाहतूक विभागातर्फे शहरात केली जाणार आहे. जर या परीक्षेत दहापैकी पाच गुण न मिळाल्यास चालकांना दोन तासांत अभ्यास करून पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

हेल्मेटचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी जर दुचाकीचालकाकडे हेल्मेट नसल्यास त्यास दोन तास नाशिक फर्स्ट येथे समुपदेशन करण्याची कारवाई केली होती. यानंतर ‘नो हेल्मेट नो पेट्रोल ही’ मोहीम १५ ऑगस्टपासून शहर हद्दीत सुरू केली होती. त्यानंतर सर्व शासकीय, खासगी कार्यालये, आस्थापना या ठिकाणी हेल्मेटसक्ती करण्यात आली. मात्र, या सर्व उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी आता समुपदेशन ही प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यानंतर आयुक्तांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमांची अंमलबजावणी बुधवार (ता.१) पासून शहरात केली जाणार आहे. या नव्या नियमानुसार आता हेल्मेट वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांना दहा गुणांच्या परीक्षेस सामोरे जावे लागणार आहे. यात हेल्मेट नसल्यास पकडले गेले तर त्याचे दोन तासांचे समुपदेशन केले जाईल. यानंतर दहा गुणांची परीक्षा होईल. जर दहापैकी पाच गुण मिळविल्यास त्याच वाहन त्यास परत दिले जाईल. मात्र, चार गुण मिळाल्यास पुन्हा दोन तासांचे समुपदेशन केले जाईल. यासाठी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे एक बुकलेट तयार करण्यात आले आहे. हे बुकलेट संबंधित दुचाकीस्वारांसाठी पुस्तकाचे

काम करेल.

१२ केंद्र निश्‍चित

हेल्मेट नसल्यास कारवाई करण्यासाठी शहरातील गर्दीची बारा ठिकाणी निश्‍चित करण्यात आली आहे. या ठिकाणी दुचाकीचालक व त्यांच्या पाठीमागे असलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातले नसल्यास त्यांच्यावर ही कारवाई होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा SIT चौकशी होण्याची शक्यता

Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत

Sunday Gold Rate: रविवारी सोनं पुन्हा घसरलं! मुंबईतले भाव सर्वात कमी; तुमच्या शहरातले दर काय?

SCROLL FOR NEXT