Hanged esakal
नाशिक

नाशिक : वरचे टेंभे येथे जंगलात महिलेची आत्महत्या

दिपक खैरनार : सकाळ वृत्तसेवा

अंबासन (जि. नाशिक) : वरचे टेंभे (ता. बागलाण) येथील जुन्ने बोढरी रोडलगत असलेल्या जंगलात एका अनोळखी महिलेचा झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जायखेडा पोलिस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून, संबंधित महिलेच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जात आहे. (Woman commits suicide in forest at varche Tembhe nashik news)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (ता. १८) वरचे टेंभे गावालगतच्या जंगलातील जुन्ने बोढरी रोडलगत एक अनोळखी महिला, वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्षे वयोगटांतील (नाव, पत्ता समजून आले नाही) असून, निंबाच्या झाडास गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक तुषार भदाणे व कर्मचाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन घटनास्थळी धाव घेऊन तपासचक्र सुरू केली. मात्र संबंधित महिलेची ओळख पटली नसल्याने पोलिस कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.

संबंधित महिलेचा रंग सावळा, डोक्यावर काळे रंगाचे केस, गळ्यात काळा मण्यांची माळ, अंगात फिकट नारंगी रंगाची साडी, काळ्या रंगाचे ब्लाऊज, त्यावर फुलपाखरूंचे डिझाइन, डाव्या हातावर सोनी संतोष गोंदलेले, उजव्या व डाव्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या, उजव्या हातात देवाचा धागा बांधलेला, डाव्या हातात लोखंडी कडे, पायात पैंजण, मृताच्या बाजूस कापडी पिशवी त्यात वापरलेल्या साड्या व लहान मुलाचे जिल्हा परिषद शाळेचा गणवेश, चप्पल आहे. ओळख अद्याप पटत नसल्याने संबंधित महिलेची ओळख पटविण्यासाठी जायखेडा पोलिस ठाणे येथे संपर्क करण्यासाठी आवाहन केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनानुसार उपनिरीक्षक तुषार भदाणे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

Jewali Burglary: जेवळीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ! ५ ते ६ घरे फोडली, लाखोंचा ऐवज लंपास; गावात भीतीचे वातावरण

Laxman Hake: आरक्षणावरून पुन्हा रणकंदन; हाकेंचा भुजबळांना थेट सवाल!

SCROLL FOR NEXT