woman life was saved due to the promptness of the girl Sakal
नाशिक

चिमुकलीच्या तत्परतेमुळे वाचला आईचा जीव; सर्वत्र होतंय कौतुक

युनूस शेख

जुने नाशिक : चिमुकलीच्या समयसूचकता आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आईचे प्राण वाचले. गंजमाळ भागात शुक्रवारी (ता. १३) दुपारी ही घटना घडली. आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला पोलिसांनी वाचवत उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून, ती सुस्थितीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गंजमाळ पोलिस चौकी शेजारी झोपडपट्टीत सदर ४५ वर्षीय महिला वास्तवास आहे. तिच्या पतीने तिला घटस्फोट देण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यातून दोघांचा वाद झाला. वाद मोठ्या प्रमाणावर झाल्याने पती काही वेळाने तेथून निघून गेला. त्यामुळे वाद संपला होता. तरीदेखील महिलेने रागाच्या भरात घरातील पंख्यास साडी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रकार घरात तिच्या मुलीसमोर घडला.

घाबरलेल्या अवस्थेत तिने गंजमाळ चौकीतील पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शोध पथकास घटनेची माहिती मिळाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरीक्षक जितेंद्र माळी, सेदाने, सहाय्यक उपनिरीक्षक कडाळे, ठाकरे यांच्यासह गंजमाळ चौकीतील हवालदार नरेंद्र जाधव, युवराज पाटील, बीट मार्शल हासे, सहाणे काही मिनिटात घटनास्थळी दाखल होत बंद दरवाजा खोलून आत प्रवेश केला. महिला साडीच्या साह्याने पंख्यास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तिच्या गळ्यातील साडी कापून तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. महिलेच्या लहान मुलीने योग्य वेळी दाखवलेली समयसूचकता आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले. तिचे प्राण वाचल्याने परिसरातील नागरिकांनीदेखील समाधान व्यक्त करत पोलिस आणि चिमुकलीचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani house firing : पाचवा आरोपी एन्काउंटरमध्ये जखमी; पोलिसांना गयावया करत म्हणू लागला...

EPFO Update: 'पीएफ'ची सगळी माहिती एका क्लिकवर; काय आहे Passbook Lite?

Kannad News : शहीदांच्या ८५ वर्षीय आई-वडिलांना दोन तासांत न्याय; तहसीलदारांची संवेदनशील भूमिका

Most Dangerous Room in the House: स्वयंपाकघर किंवा गॅरेज नाही, तर हृदयरोगतज्ज्ञांच्या मते घरातील ही खोली आहे आरोग्याच्या दृष्टिने अधिक धोकादायक

Latest Marathi News Updates: कोथरूड गोळीबारप्रकरणी घायवळ गँगच्या ५ जणांना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT