Murder  esakal
नाशिक

Nashik Crime: म्हसरूळ येथील महिलेच्या खुनाची होईना उकल; गुढ अद्यापही कायम

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : दिंडोरी रोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ गोणीत कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खुनाचा पाच दिवस उलटूनही उकल होऊ शकलेली नाही. म्हसरुळ पोलिसांसह समांतर गुन्हेशाखेची पथके तपास करीत आहेत. मात्र अद्यापही या खुनाचे गुढ कायम आहे. (Womans murder in Mhasrul solved mystery still remains Nashik Crime)

घटनेला पाच दिवस उलटूनही पोलिसांना खुनाचा उलगडा करता आलेला नाही. त्यात दोन दिवस पोलीस गणेश विसर्जन मिरवणूक व जुलूस मिरवणुकीत व्यस्त असल्याने तपास थांबला होता. मात्र अद्यापही याप्रकरणात पोलिसांच्या हाती काहीही ठोस लागलेले नाही. त्यामुळे या फिरस्त्या महिलेच्या खुनाचे गुढ कायम आहे.

गेल्या मंगळवारी (ता. २६) दिंडोरी रोडवरील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ एका गोणीमध्ये महिलेचा मृतदेह टाकून देण्यात आलेला हाेता.

रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांनी दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली असता, त्या गोणीत सुलोचना पवार यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला हाेता. सायंकाळी शवविच्छेदन अहवालानुसार महिलेचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले.

या मृतदेहाजवळ पिशवीत कपडे व भांडी होते. यासह मृतदेहाच्या गळ्यात एक पिवळ्या धातूच्या मण्यांचे मंगळसूत्र व कानात जोड आढळले आहे. याप्रकरणी मृत महिलेची आई, भाऊ व मुलगा यांनी ओळख पटविली.

हे सर्वजण दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील रहिवाशी आहेत. नातलगांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेची यापूर्वीच दोन लग्ने झाली आहेत. दोन्ही नवऱ्यांनी मात्र तिच्याशी वैवाहिक संबंध तोडलेले आहेत.

ती काहीशी वेडसर आणि सतत घर सोडून जात असल्याचे तिच्या नातलगांनी पोलिसांना सांगितले आहे. मयत महिला ही फिरस्ती असल्याने तिचा खून का व कशासाठी करण्यात आला याबाबत अजून उलगडा झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT