नाशिक

महिला बनल्या ‘लखपती दीदी’

CD
सेकंडमेन NSK26H34763 जळगाव : दिवाळी महोत्सवातून महिला बचत गटांनी ठेवलेली उत्पादने. ----------------------- भादली बुद्रुक-नशिराबाद प्रभागातील महिला बनल्या ‘लखपती दीदी’ --- स्वावलंबनाच्या दिशेने; दिवाळी महोत्सवातून बचतगटांच्या उत्पादनांना मिळाली बाजारपेठ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.८ : ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत समितीतर्फे नशिराबाद-भादली बुद्रुक प्रभागातील आधार महिला प्रभाग संघाच्या वतीने दिवाळी महोत्सव झाला. याद्वारे महिला स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या विविध घरगुती व पारंपरिक वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल उभारले होते. त्यातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला व स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळाले. दिवाळी हा सण आनंद, उत्साह व प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. यासणाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यातील स्टॉलमध्ये महिलांनी स्वतः तयार केलेले घरगुती पारंपरिक फराळ, आकाश कंदील, आकर्षक दिवे, इमिटेशन ज्वेलरी, साड्या व इतर विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. या उपक्रमामुळे महिलांना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची, उत्पादनांची विक्री करण्याची व स्वतःच्या उत्पन्नात वाढ करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. बचत गटांच्या माध्यमातून केवळ बचत व आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता महिलांनी उत्पादन, व्यवसाय, विपणन व उद्योजकतेच्या क्षेत्रातही पुढाकार घ्यावा, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश होता. अशा उपक्रमांमधून ग्रामीण महिला ‘लखपती दीदी’ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. यांनी घेतला पुढाकार या महोत्सवासाठी जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समन्वयक हेमांगी टोकेकर यांनी पुढाकार घेतला. आधार महिला प्रभाग संघातील पदाधिकारी व नशिराबाद-भादली बुद्रुक प्रभागातील १८ ग्रामसखी ताई यांचे विशेष सहकार्य लाभले. महिला स्वयंसहायता समूहाच्या माया भावसार, सुनीता भावसार, वैशाली तारकस, कृष्ण वर्षा वाणी, लीना वाणी, भारती पाटील, ज्योती पूनसे या प्रमुख महिलांनी पारंपारिक उत्कृष्ट दर्जेदार चविष्ट फराळ, लक्ष्मीच्या मूर्ती, पणत्या, पूजेचे साहित्य, आकाश कंदील, शोभेच्या वस्तू, साड्या, इमिटेशन ज्वेलरी आदी साहित्य विकून लाखोंची विक्रमी उलाढाल करून त्यांनी लखपती दीदी योजनेचा उद्देश जणू काही सत्यात उतरवला.

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

Latest Marathi News Live Update: : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली आनंददायी दिवाळी; 'नंदनवन' बंगल्यावर फराळ वाटप करत दिल्या शुभेच्छा

Siddi Community Marathi Song Viral Video : आफ्रिकन लूक अन् अस्सल मराठी गावरान ठसका; माठावर ठेका धरत सिद्दी तरुणांनी गायले ‘हिरो होंडा’ गीत

SCROLL FOR NEXT