(टुडे पान एक ॲन्कर)
फोटो : NSK26H31469
नंदुरबार : मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित चंद्रकांत रघुवंशी, डॉ. मिताली सेठी, पंकज पटले, डॉ. चंद्रकांत पवार आदी.
--------------------
पात्र महिला बचतगटांना मिळाला आर्थिक मदतीचा लाभ
राणी दुर्गावती महिला मेळाव्यात यशस्वी महिला उद्योजकांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ६ : आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्या वतीने ‘सेवा संकल्प’ अभियानानिमित्त राणी दुर्गावती जयंतीनिमित्त ‘राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण’ कार्यक्रमांतर्गत विशेष महिला मेळावा झाला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या या मेळाव्यात यशस्वी महिला उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. तसेच, पात्र महिला बचतगटांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदतीचा लाभ देण्यात आला.
मेळाव्यास आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी पंकज पटले, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते. मान्यवराच्या हस्ते शासकीय आदिवासी विकास वसतिगृहात राहून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या, शासकीय नोकरी मिळवलेल्या तसेच उच्च पदवी संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा, क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींचाही गौरव करण्यात आला. शहादा, नवापूर व नंदुरबार तालुक्यात १ जुलै ते १५ सप्टेंबरदरम्यान स्थापन झालेल्या पात्र महिला बचतगटांच्या थेट बँक खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात आली. केंद्रीय अर्थसंकल्प योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. २०२३- २४ मध्ये निवड झालेल्या घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अधिकृत निवड प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
मेळाव्यास नंदुरबार, शहादा व नवापूर तालुक्यातील ६०० हून अधिक महिला व बचतगटांच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मेळावा यशस्वी करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
---------
महिलांची आरोग्य तपासणी
मेळाव्यात महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. तसेच, बचतगट सक्षमीकरण कार्यशाळेद्वारे महिलांना स्वावलंबनासाठी मार्गदर्शन करण्यात आले. विविध शासकीय यंत्रणांच्या तज्ज्ञ प्रतिनिधींनी स्वयंरोजगार, उद्योग निर्मिती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, आर्थिक सहाय्य योजना व विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. महिला व बचतगटांना स्वावलंबी बनविण्यासाठी शबरी महामंडळाचे हितेश पाटील, उमेदचे यशवंत ठाकूर व अजय जाधव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कांता बनकर, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख राजेंद्र दहातोंडे, जिल्हा उद्योग केंद्राचे गिरीष चौधरी यांनी त्यांच्या विभागातील योजनेची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.