नाशिक

आम्ही साऱ्या जणी---लोगोआम्ही साऱ्या जणी---लोगो

CD
टुडे ३ मेन फिचर (फोटोला चार कॉलम जागा सोडावी) --- जळगाव : ‘सकाळ’च्या ‘आम्ही साऱ्याजणी’ उपक्रमात सहभागी झालेल्या महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी महिला. लोगो आम्ही साऱ्याजणी महसूल विभाग ---------- शीर्षक घराघरांत शासकीय योजना पोहोचविण्याचा ध्यास -- उपशीर्षक महसूल विभागातील महिलांची लोकाभिमुख कामकाजासाठी धडपड सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : महसूल विभागात काम करताना समाजसेवेची संधी मिळते. नागरिकांना महसुली दाखल्यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हाच आमच्यासाठी आनंद असतो. शासन आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून काम करताना नोकरीसोबतच कुटुंबाची जबाबदारीही सांभाळावी लागते. यात महिलांची कसरत होते. मात्र, सहनशीलता, धैर्य आणि प्रामाणिकपणाच्या बळावर शासकीय सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्नशील असल्याच्या भावना तहसील कार्यालयातील महिलांनी ‘सकाळ’च्या ‘आम्ही साऱ्याजणी’ या उपक्रमात व्यक्त केल्या. --------- शासनाच्या योजना लाभाथर्यांपर्यंत शीतल राजपूत (तहसीलदार) : अनेक नागरिक रेशन कार्ड, संजय गांधी येाजना, विविध दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात येतात. त्यांना संबंधित दाखले लवकरात लवकर कसे उपलब्ध करून देता येतील व शासनाची प्रतिमा कशी उंचावेल, यासाठी प्रयत्न असतो. शासनाच्या विविध योजना संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवितो. महाराजस्व अभियान, सेवा संकल्प अभियानांतर्गत अनेक गरजूंना एकाच वेळी एकाच ठिकाणी प्रमाणपत्रे लाभ मिळवून दिला आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत यशस्वी कामगिरी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. -------------- सामाजिक कार्याचा आनंद प्राजक्ता केदार (नायब तहसीलदार, संजय गांधी योजना) : संजय गांधी निराधार योजनेचे काम करताना अनेक वयोवृद्धांना शासनाच्या योजनेचा त्वरीत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असते. दुर्बल, दिव्यांग, विधवा, एकल महिलांना मदतीसाठी नेहमी तत्पर असते. शासकीय कामकाज करण्याबरोबरच सामाजिक कार्य करण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. अनेक जण रागाने कामे घेऊन येतात, त्यांना समजावून सांगत लाभ देण्याचा प्रयत्न असतो. कुटुंबीयांकडे लक्ष देऊन नोकरी करणे कसरत असते. मात्र देवीने आम्हाला संयम, धैर्य हे गुण दिले त्याचा उपयोग करतो. ------------ पुरुषांच्या बरोबरीने काम सारिका दुरगुडे (मंडल अधिकारी, शिरसोली) : ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांशी रोजचा संपर्क येतो. जे तलाठी नवीन आहेत त्यांना समजून घेत महसूलचे कार्य करून घेतो. महाराजस्व अभियान, सात बारा फेरफार अदालतीतून अनेकांना न्याय दिला आहे. उजाड कुसुंबा गावात ९० नागरिकांना एकाच वेळी जातीचे प्रमाणपत्र दिले आहे. त्या नागरिकांना असे प्रमाणपत्र असते, तेही माहिती नव्हते. गौण खनिज वाहून नेणाऱ्यांवर कारवाई करताना पुरुषांच्या बरोबरीने कार्य करते. ----------------- समस्या जाणून घेत कार्य निधी मानेकर (ग्राम महसूल अधिकारी, कंडारी) : कार्यालयात आलेला नागरिक अनेक समस्यांनी ग्रस्त असतो. प्रत्येकाच्या समस्या आम्ही समजावून घेतो. आलेल्या नागरिकाचे महसूलचे काम होऊन तो समाधानाने घरी गेला पाहिजे हे मी पाहते. मात्र काही गैर काम केले तर त्याला आमचा (महसूलचा) धाक वाटला पाहिजे, असे मी कार्य करते. जेणे करून त्याचा शाासनाच्या कामाबाबत आदर वाटला पाहिजे. ------ नागरिकांचा शाासनाविषयी वाढतोय आदर अश्विनी वाघ (महसूल सहाय्यक) : मला दिलेले काम अधिक चांगल्याप्रकारे, तंत्रज्ञान वापरून कसे करता येईल यावर भर देते. आलेल्या नागरिकांना शाासकीय योजनेंतर्गत जो लाभ दिला तो लवकर कसा मिळेल, शासनाप्रती त्याची आस्था कशी वाढेल याप्रकारे कार्य करते. संबंधिताचे महसूल संंबंधित कार्यझाले की तो आशीर्वाद देऊन गेला पाहिजेल, अशी भावना असते. ------ कुंभार बांधवांना मोफत गाळ पूजा पाटील (महसूल सहाय्यक) : अवैधरित्या गौण खजिनाची चोरी करणे, हा कायद्याने गुन्हा आहे. अशाा वाहनांवर दंड करतो. वाहन जप्ती, जप्त वाहनांचे लिलाव करण्याची कारवाई करतो तर दुसरीकडे कुंभार समाजाला सातशे ब्रास गाळ मोफत मिळण्याची प्रक्रियाही सुरू आहे. संबंधितांना त्याबाबत कार्ड वाटप सुरू आहे. ------- दक्षतापूर्वक कार्य शिवानी शेळके (महसूल सहाय्यक) : तहसील कार्यालयांतर्गत ११० कर्मचारी आहेत. त्यांचे वेतन, रजा, सेवा पुस्तके अपडेट करण्याचे काम करते. नवीन सेवार्थ प्रणालीचे आव्हान आहे. दैनदिंन कामकाज करताना अपडेट राहावे लागते. चुकीने रजा, सुटी पडली तर कर्मचाऱ्याच्या वेतनावर परिणाम होतो. तो व्हायला नको, यासाठी दक्षतापूर्वक कार्य करावे लागते. --------------- सामाजिक उपक्रमांवर भर दीपमाला सोनवणी (महसूल सहाय्यक, दंड प्रभाग) : फौजदारी स्वरूपातील कामाचा टेबलवर मी कार्य करते. शस्त्र परवाने देण्याची कार्यवाही, स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र दिन, प्रजासत्ताक दिन, एक मे यादिवशी शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमास बोलावणे, त्यांचा सन्मान राखणे, मिसाबंदींना मानधन देण्याची कार्यवाही, तालुक्यात शासकीय नोकरीस नव्याने रूजू होणाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्रे तपासणे आदी कार्य करते. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

SCROLL FOR NEXT