पान चार
-----------
27265
येवला : सेवा संकल्प अभियानाच्या समारोपानिमित्त लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करताना प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन.
महिला बचत गटांना मिळाले आर्थिक बळ
येवल्यात सेवा संकल्प अभियानाची सांगता; साडेपंधरा लाखांचे अर्थसहाय्य
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.२१ : महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानाचा येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात समारोप झाला. यावेळी महिला बचत गटांना १५ लाख ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले. प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, शहर पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, तालुका पोलिस निरीक्षक श्री. शिंदे आदी उपस्थित होते.
महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने नगरपरिषदेच्या वतीने मेरा बचत गटाला १ लाख ५० हजार रुपये, माऊली महिला बचत गटाला ५ लाख ५० हजार रुपये, ओम नमः शिवाय महिला बचत गटाला ५ लाख ५० हजार रुपये आणि अबोली महिला बचत गटाला ३ लाख रुपये अशा एकूण १५ लाख ५० हजार रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत चार लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या घरकुल अनुदानाच्या टप्प्याचे वितरण करण्यात आले. यामुळे पात्र लाभार्थ्यांना घरकुल उभारणीसाठी आर्थिक आधार मिळाला. महसूल विभागाच्या वतीने २० नागरिकांना नवीन रेशनकार्डे, तर ३० महिलांना शेतकरी कार्डांचे वाटप करण्यात आले.
अभियानाच्या कालावधीत प्रशासनाच्या वतीने नवीन शिधापत्रिकांचे वाटप, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा साधनांचे (पीपीई किट) वितरण असे विविध उपक्रम राबविण्यात आले. सामाजिक बांधिलकी,पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक आरोग्याविषयी जागरूकता, नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देणे यावर अभियानात भर देण्यात आला.
कार्यक्रमास नगरपरिषदेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती पारुल गुजराथी, उपमुख्याधिकारी चंद्रकांत भोये, काकासाहेब शिरसाट, नितीन आहेर, सुषमा विखे, कोमल कडतन, वृषाली अहिरे, उज्वला अहिरे, निलेश खैरनार आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन संदीप बोढरे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.