नाशिक

आत्मनिर्भर भारत महिला उद्योजिका महोत्सवाचा शुभारंभ

CD
फोटो -NSK26H34206 डीजीपीनगर : येथे आत्मनिर्भर भारत महिला उद्योजिका महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी महंत देविनंदगिरी महाराज, माजी महापौर सतीश कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, मंगला नन्नावरे, वैशाली कुलकर्णी, रूपाली निकुळे, प्रकाश नन्नावरे, यशवंत निकुळे, उदय जोशी, स्वाती कटारे. आत्मनिर्भर भारत महिला उद्योजिका महोत्सवाचा शुभारंभ सकाळ वृत्तसेवा डीजीपी नगर, ता. १ :''सक्षम स्त्री, सक्षम कुटुंब, सक्षम समाज'' हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ''आत्मनिर्भर भारत महिला उद्योजिका महोत्सव व दिवाळी फन अँड एक्झिबिशन एक्स्पो २०२६''चा शुभारंभ जुना आखाडा, त्र्यंबकेश्वरचे महंत महामंडलेश्वर १००८ देविनंदगिरी महाराज यांच्या हस्ते उत्साहात झाला. यावेळी माजी महापौर सतीश कुलकर्णी, पूर्व प्रभाग सभापती मंगला नन्नावरे, वैशाली कुलकर्णी, नगरसेविका रूपाली निकुळे, प्रकाश नन्नावरे, माजी नगरसेवक यशवंत निकुळे, उदय जोशी, स्वाती कटारे आदी उपस्थित होते. भगव्या रंगाच्या वेशभूषेत शेकडो महिलांनी लक्ष वेधून घेत कार्यक्रमात सहभाग नोंदविला. उद्घाटनप्रसंगी देविनंदगिरी महाराज म्हणाले, महिलांच्या कलागुणांना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे असे उपक्रम कौतुकास्पद आहेत. यावेळी पाद्यपूजन व शंखनाद करण्यात आला. आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी उपस्थितांना कुंभप्रतिज्ञाही देण्यात आली. अँकर आदित्य यांच्या ''होम मिनिस्टर'' कार्यक्रमात सोन्याची नथ, पैठणी, अष्टविनायक टूर, तिरुपती दर्शन पासेस व भेटवस्तूंची बक्षिसे देण्यात आली. हा महोत्सव ३०, ३१ ऑक्टोबर तसेच १ व २ नोव्हेंबर रोजी वंदे मातरम् प्रतिष्ठान मैदान, के. के. वाघ शाळेजवळ, डीजीपी नगर-१ येथे सुरू राहणार आहे. ''आत्मनिर्भर भारत'' आणि ''व्होकल फॉर लोकल'' संकल्पनेला बळ देणाऱ्या या एक्स्पोमध्ये महाराष्ट्राचे रंग, जादूचे प्रयोग, सिंहस्थ दीपोत्सव व बॉलिवूड नाइट्स हे आकर्षण असणार आहे. अभिनेत्री विद्या करंदीकर, मृणाल दुसानीस व राधिका देशपांडे यांचीही उपस्थिती लाभणार आहे. नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी महापौर कुलकर्णी, प्रतिष्ठानच्या संस्थापिका तथा नगरसेविका संध्या कुलकर्णी आणि संयोजक वैभव कुलकर्णी यांनी केले आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो मार्गिका ३ च्या तिकीट दरांची घोषणा; ३ नोव्हेंबरला मोदींच्या हस्ते उद्घाटन

'इच्छाधारी नागीण'ची मुख्य अभिनेत्री बदलली! नक्की कारण काय? झी मराठीने दिला प्रेक्षकांना धक्का; नवा प्रोमो Viral

Latest Marathi News Update : पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? बच्चू कडूंचा सरकारला सवाल

Pargav Water Crisis News : आंबेगावच्या पूर्वभागात घोडनदीकाठी गंभीर जलसंकट; डिंभे धरणातून पाणी सोडण्यासाठी प्रशासनाकडे तीव्र मागणी

Recharge Plan: स्वस्त रिचार्ज प्लान फक्त १७९ रुपयांपासून सुरू! वर्षभर कॉलिंगची सुविधा...पाहा आणखी काय मिळणार?

SCROLL FOR NEXT