After the laborer gave birth on the road, while examining the twin girls, Dr. Rajendra Borse. esakal
नाशिक

Nashik : मोलमजुरी करणाऱ्या महिलेची रस्त्यावरच प्रसूती

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : बाळंतपण सुलभ होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. असे असताना मोलमजुरी करणाऱ्या महिलेची प्रसूती रस्त्यावर झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २९) दुपारी पंचवटीतील अमृतधाम परिसरात घडली.

या ठिकाणी असलेले खासगी डॉक्टर व माजी नगरसेविका प्रियांका माने यांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील सोपस्कार डॉ. बोरसे यांचे हस्ते निर्विघ्न पार पडले. या महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला असून, त्यांना पुढील उपचारासाठी मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (women labor gives birth on street Nashik Latest Marathi News)

शीतल विकी कांबळे या महिलेला दुपारी साडेबारा- एकच्या सुमारास अचानकपणे प्रसूती कळा सुरू झाल्या. त्या येथील झाडाच्या खाली विश्रांती घेत बसल्या. कळा अधिकच वाढल्याने, या महिलेची प्रसूती रस्त्यावरच झाली.

या वेळी आसपासच्या महिला मदतीसाठी धावून आल्या. काहींनी माजी नगरसेविका प्रियांका माने यांना फोनवरून माहिती दिली, तर काहींनी परिसरातील खासगी डॉ. राजेंद्र बोरसे यांना बोलावले.

डॉ. राजेंद्र बोरसे हे त्यांच्या क्लिनिकमध्ये असलेले पेशंट सोडून तत्काळ घटनास्थळी पोचले व त्या महिलेची डिलिव्हरीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. या महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. तोपर्यंत प्रियांका माने यांनी या प्रभागात असलेले मनपा आरोग्य केंद्रतील डॉ. बस्ते व दोन महिला परिचारिका वैशाली धिवर, छाया जाधव यांना आपल्या वाहनात तत्काळ घेऊन घटनास्थळी दाखल झाल्या.

माने यांनी पंचवटी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांना फोनवरून सविस्तर माहिती दिली. डॉ. राजेंद्र बोरसे यांनीही डॉ. देवकर यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून सदर महिलेला इंदिरा गांधी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जन्म दिलेले दोन्ही बाळ आणि बाळंतीण सुखरूप असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते आहे.

आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

आशासेविका परिसरातील गरोदर मातांचा सर्व्हे करीत असतात. त्यांची नोंद करीत त्यांना शासनामार्फत सर्व सोयीसुविधा व उपचार मिळविण्यासाठी मदत करीत असतात. असे असताना सदर महिला रस्त्यावर प्रसूत झाल्याने आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

ग्रामीण भागात दिसणारे चित्र शहरी भागात पाहायला मिळत असेल तर ते धक्कादायक असून, प्रशासनाने दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT