alcohol and chemicals destroyed by women in Malgaon. esakal
नाशिक

Nashik News: दारूबंदीसाठी मळगावच्या महिलांचा एल्गार! 10000 लिटर रसायन, गावठी दारू, हातभट्टीचे साहित्य नष्ट

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्यातील मळगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत अनेक वर्षांपासून अवैध गावठी दारू निर्मिती केली जाते. या अवैध दारूमुळे येथील आदिवासी महिलांचे संसार उघड्यावर आले आहेत.

त्यामुळे रविवारी (ता.७) गावातील २०० ते २५० आदिवासी महिलांनी एकत्रित येत सरपंच अनुसया पांडुरंग गांगुर्डे व पोलिस पाटील गोटीराम गांगुर्डे, अशोक बर्डे, धनराज चौरे यांना सोबत घेत दारू बंदीचा निर्णय घेत स्वतः हातभट्टी सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन शेकडो लिटर गावठी दारू आणि दारू बनविण्याचे रसायन नष्ट केले आहे.

अवैध दारू बंदीसाठी पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांना निवेदन दिले. (Women of Malgaon protest for alcohol ban 10000 liters of chemicals village liquor materials destroyed Nashik News)

कळवण तालुक्यातील मळगाव बुद्रूक, खुर्द, आदिवासी पाडे, वस्ती अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे. हे गाव कळवण , सटाणा तालुक्याच्या सीमेवर असल्याने या भागात दोन्ही तालुक्यातील तळीराम मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची गावठी दारू पिण्यासाठी या ठिकाणी येत असतात.

त्यामुळे याठिकाणी तरुणासह पुरुषांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. घरातील कर्ता पुरुष व्यसनाच्या आधीन गेल्याने संसाराची संपूर्ण जबाबदारी आदिवासी महिलांवर आली आहे. महिलांना रोजंदारीसाठी मिळेल ते शेतातील कामावर जावे लागत आहे.

त्यामुळे गावातील गावठी दारू अड्डे याबाबत स्थानिक महिलांनी अनेकवेळा सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या. परंतु कोणीही त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही.

अखेरीस तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने संतप्त महिलांनी रविवारी (ता.७) एकत्र येत सरपंच अनुसया पांडुरंग गांगुर्डे, पोलिस पाटील, गोटीराम गांगुर्डे, अशोक बर्डे, धनराज चौरे यांना सोबत घेऊन ग्रामपंचायत हद्दीतील हातभट्या उद्ध्वस्त करून शेकडो लिटर रसायन व गावठी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट केले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यावेळी गावातील ग्रामसेवक नारायण रामोळे, सुखदेव बागूल, धनराज चौरे, सीताबाई पवार, कल्पना जोपळे, काळुबाई गांगुर्डे, गोटीराम सोनवणे, सुनंदा महाले, दया महाले, हसूराव गवळी, गुलाब चौधरी, पोलीस पाटील गोटीराम गांगुर्डे, अशोक बर्डे, काळीबाई पवार, मुक्ता सुभाष गायकवाड, उत्तम पालवी, भोरु गांगुर्डे, अशोक पवार, काळूराम महाले, यांच्यासह अनेक महिला, पुरुष उपस्थित होते.

"मळगाव परिसरासह कळवण पोलिस ठाणे हद्दीत कोठे अवैध दारूचे हातभट्टी चालू असल्यास कळवण पोलिस ठाण्यात कळवावे तेथे जाऊन पुढील कारवाई करू."

- समाधान नागरे, पोलिस निरीक्षक, कळवण

"गावातील तरुण मंडळी दारूच्या व्यसनामुळे कुठलाही कामधंदा न करता दिवसभर दारू पिऊन पडत आहे. सायंकाळी महिला कामावरून आल्यावर दारू पिण्यास पैसे मागतात. पैसे न दिल्याने शिवीगाळ व मारझोड करतात. या त्रासाला कंटाळून गावातील महिलांनी हा निर्णय घेत दारूअड्डे उद्ध्वस्त केले."- सीताबाई पवार, ग्रामपंचायत सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT