crime esakal
नाशिक

Nashik Crime: गावठी हातभट्ट्यांविरोधात महिला पोलिस जंगलात; 4 पथकांकडून कारवाई करीत अड्डे उद्‍ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : जिल्ह्यातील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांचा नायनाट करण्यासाठी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी महिला पोलिस पथकांची नियुक्ती केली आहे.

या पथकांनी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील जंगलात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यांविरोधात धडक कारवाई करीत सहा गुन्हे दाखल केले आहेत. (Women police in forest against village hand furnaces Bases destroyed by action by 4 teams Nashik Crime)

पोलिस अधीक्षक उमाप यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. ग्रामीण भागात चोरीछुप्या रीतीने गावठी दारूची निर्मिती करून विक्री केली जाते.

याविरोधात ग्रामीण पोलिसांतर्फे धडक मोहीम राबविली जात आहे. गेल्या आठवड्यात तर पोलिस अधीक्षक उमाप हे स्वत: अशा मोहिमेत सहभागी झाले होते.

जंगलात सुरू असलेले हातभट्टीचे अड्डे नेस्तनाबूत करण्यासाठी ग्रामीण दलातील चार पथकांनी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील जंगलांमध्ये शिरकाव करीत कारवाई केली.

या पथकांनी या तालुक्यातील खेडभैरव, देवाची वाडी, पिंपळगाव घाडगा, चिंचलेखैरे, देवळे, तळेगाव या दुर्गम भागातील जंगलात जाऊन गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्‍ध्वस्त केले.

या कारवाईत एक लाख ५८ हजार रुपयांची हातभट्टीची दारू, रसायन जप्त करीत नष्ट केले. तसेच, या प्रकरणी इगतपुरी, घोटी व त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यांमध्ये दारूबंदी कायद्यान्वये सहा गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चार महिला पथकांची नियुक्ती

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात जंगल परिसर आहे. या जंगलात गावठी हातभट्ट्यांचे अड्डे आहेत. हे अड्डे उद्‍ध्वस्त करण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी महिला पोलिस अंमलदारांची चार पथके नियुक्त केली आहेत.

एका पथकात आठ महिला अंमलदारांचा समावेश करण्यात आला असून, अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी सुरू आहे.

"ग्रामीण भागातील पोलिसपाटील आणि नागरिकांनी आपल्या परिसरातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या महिला पथकाला सहकार्य करावे. या कारवाईमुळे गावठी दारूच्या अड्ड्यांचा नायनाट करता येईल"

- शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heatwave: पुणे परिसरात उष्णतेचा तडाखा; लोहगावचा पारा ४२ अंशांवर, तापमान आणखी वाढणार, अंगाची लाहीलाही..

मृण्मयी देशपांडेचं चालतं फिरतं घर पाहिलत का? आता महिनाभर तिथेच राहणार, Viral Video

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

SCROLL FOR NEXT