women preferring bandesh pattern saree for navratri nashik news esakal
नाशिक

Navratri Festival 2023 : नवरंगांच्या साड्यांची वाढती क्रेझ! बंदेश पॅटर्नला पसंती

सकाळ वृत्तसेवा

Navratri Festival 2023 : नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया खेळाबरोबरच नऊ दिवसांमधील नवरंग साड्या, कुर्ता पेहरावाची क्रेझ आहे. त्या दिवसातील रंग आपल्याकडे असावेत यासाठी तरुणांसह महिलांनी खरेदीला प्राधान्य दिले असून महिलांची साड्यांमधील बंदेश पॅटर्नला, तरुणांची कुर्ता- पायजमा, तरुणींची घागऱ्याला विशेष पसंती मिळत आहे.

गणेशोत्सवानंतर सगळ्यांनाच नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहे. १५ ऑक्टोबरला घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला सुरवात होत आहे. (women preferring bandesh pattern saree for navratri nashik news)

नवरात्रोत्सवात नवरंगांना विशेष महत्त्व आहे. पिवळा, हिरवा, राखाडी, नारंगी, पांढरा, लाल, रॉयल ब्लू, गुलाबी, जांभळा आदी नऊ रंगांच्या साड्या, कुर्त्याला मागणी वाढली आहे.

बाजारात विशेष करून जोडप्यांसाठी कुर्ता व घागऱ्याचे नवनवीन पॅटर्न आले आहेत. दररोज वेगळा ड्रेसकोड असावा याकडे तरुणांसह महिलांचा कल असतो, त्याप्रमाणे खरेदी होत असून या खरेदीतून कापड बाजारात मोठी उलाढाल होत आहे. दरम्यान, शहरातील विविध भागातील ड्रेपरींकडून चनिया चोळी भाडेतत्वावर मिळत असल्याने चनिया चोळीच्या मागणीत मोठी घट झाली आहे, त्यामुळे कापड व्यावसायिकांनी नवरंग असलेल्या साड्या, घागरा, कुर्ता-पायजमा यावर भर दिला आहे.

खरेदीकडे कल

नवरात्रोत्सवाला अवघा एक आठवडा असल्याने महिलांनी विविध पॅटर्नच्या साडी खरेदीस प्राधान्य दिले असून विविध रंगांच्या साड्या महिलांकडून खरेदी केल्या जात आहे. महिलांकडून नवरात्रोत्सवाबरोबरच दसरा, दिवाळीची खरेदी आताच केली जात असल्याचे दिसत आहे.

वर्क असलेल्या बंदेज, लेटिया, ब्राइट कलरमधील साड्यांना मागणी आहे. गरबा नृत्य, दांडिया खेळण्यासाठी चनिया चोली, घागरा पुरुषांसाठी कुर्ता, पायजमा आदींचे विविध पॅटर्न दालनांमध्ये उपलब्ध असून पंधराशे पासून पुढे किमती आहे. जोडप्यासाठी मॅचिंग असलेल्या कुर्ता-घागर्याला पसंती आहे.

"नवरात्रोत्सवात कापड बाजारात महिला व जोडप्यांसाठी विशेष कलेक्शन आले आहेत. वर्क असलेल्या नवरंग असलेल्या बंदेज, लेटिया साड्यांना महिलांची पसंती आहे. तरुणांची कुर्ता-पायजमा, तरुणींची घागऱ्याला पसंती आहे." - नरेश पारख, अध्यक्ष, नाशिक रिटेल क्लॉथ मर्चंट असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Thane: भिवंडीच्या विकासाला नवी दिशा! घराणेशाहीला नकार; बदलाच्या राजकारणाला मतदारांची साथ, काँग्रेसचा शिलेदार उपमहापौरपदी विराजमान

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

SCROLL FOR NEXT