नाशिक

नवरात्रोत्सवानिमित्ताने ६०० महिलांना मुद्गर प्रशिक्षणातून स्वसंरक्षणाचे धडे

CD
पान दोन -------------- 15008 नाशिक : महिलांना मुद्गर प्रशिक्षण देताना शिल्पा सोनार. नवरात्रोत्सवानिमित्ताने महिलांना मुद्गर प्रशिक्षणातून स्वसंरक्षणाचे धडे सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, १३ : महिलांनी स्वसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करून संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण करता यावे, तसेच त्यांच्यामध्ये धैर्य, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत मुद्गर प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुद्गर शक्ती सेल्फ डिफेन्स क्लबच्या माध्यमातून सुमारे ६०० महिलांना मुद्गर प्रशिक्षण देण्यात आले. महिलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांच्यामध्ये स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी उपक्रमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्याबरोबरच भारतीय पारंपरिक व्यायामपद्धतीचा वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.क्लबच्या संस्थापिका शिल्पा वैभव सोनार, छत्रपती सेनेच्या कोअर टीम सदस्य विद्या चव्हाण आणि छत्रपती सेना महिला आघाडी यांच्या माध्यमातून करण्यात आले. शिबिरात प्रतिभा पवार, स्वाती पाटील, हर्षाली भोसले, प्रिया तिडके, रेखा पवार, दीपाली शिंदे, संगीता साबळे, मंजुषा संधान, श्रद्धा गायकवाड, प्रतिभा गायकवाड, सोनाली महाजन, पद्मा बावसकर, विद्या कराळे, स्वाती जगताप, रोहिता पिंगळे, दीप्ती गायकवाड, स्मिता शिंदे-माने आदी महिलांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: गोडाऊनसमोर लावलेली दुचाकी चोरीला

जैन आहे 'सनई चौघडे' मधील अभिनेत्री; घरी नवरात्री कशी साजरी होते हे सांगताना म्हणाली- आम्ही नऊ दिवस...

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT