नाशिक

रस्त्यालगतच्या वाईन शॉपमुळे महिलांची कुचंबणा; नगरसेविका राजश्री प्रजापत आक्रमक

CD
रस्त्यालगतच्या वाईन शॉपविरोधात महिलांचा सात दिवसांचा अल्टिमेटम सकाळ वृत्तसेवा चांदवड, ता. ११ : महात्मा फुले नगर, गणूर रोड परिसरातील रस्त्यालगतच्या वाईन शॉपमुळे महिलांसह नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. दुकान परिसरात मद्यपींचा वावर वाढल्याने शिवीगाळ, गोंधळ आणि भांडणांचे प्रकार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी प्रभाग सहाच्या नगरसेविका राजश्री प्रजापत यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, दुकानाच्या परवानग्यांची तपासणी करून नियमबाह्य बाबी आढळल्यास ते बंद करण्याची मागणी केली आहे. या परिसरात पिठाची गिरणी, शाळा आणि नागरिकांची वर्दळ असलेली ठिकाणे आहेत. त्यामुळे महिला, विद्यार्थिनी आणि लहान मुलांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मद्यपींच्या वावरामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. परवानग्यांवर प्रश्नचिन्ह संबंधित वाईन शॉपकडे चांदवड नगरपरिषदेचा व्यापार परवाना आणि ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नसल्याचा दावा प्रजापत यांनी केला आहे. त्यांनी २२ सप्टेंबर आणि ९ ऑक्टोबरला नगरपरिषदेकडे केलेल्या लेखी तक्रारींच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने दुकानचालकाला सात दिवसांची नोटीस बजावली आहे. व्यापार परवाना, एनओसी, बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा, मालकी किंवा भाडेकराराची कागदपत्रे तसेच मद्यविक्रीसाठी आवश्यक वैध परवाने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कागदपत्रे सादर न केल्यास उपलब्ध अभिलेख व परिस्थितीनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे नोटिशीत नमूद आहे. महिला आणि विद्यार्थिनींना भीतीच्या वातावरणात रस्त्यावरून जावे लागत असेल, तर हा सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न आहे. दुकानाच्या सर्व परवानग्यांची तातडीने तपासणी करून नियमबाह्य बाबी आढळल्यास कठोर कारवाई करावी. सात दिवसांत कारवाई न झाल्यास महिलांसह नगरपरिषदेसमोर बेमुदत धरणे धरण्यात येईल. - राजश्री प्रजापत (नगरसेविका)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT