water crisis esakal
नाशिक

Water Crisis : प्रभाग दोनमध्ये पाणीटंचाईने महिला हैराण; हंडा मोर्चाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आडगाव परिसरातील प्रभाग दोनमधील स्वामी समर्थनगर, धात्रक फाटा, सागर व्हिलेज परिसरात अवेळी व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

त्यामुळे येथील नागरिक त्रस्त असून यावर दोन दिवसांत तोडगा न निघाल्यास विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चाचा इशारा माजी नगरसेविका शीतल माळोदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे. (Women worried about water shortage in Ward Two Warning of Handa Morcha nashik news)

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

महापालिका हद्दीतील आडगाव शिवारातील गावठाणासह परिसरातील श्री. स्वामी समर्थ नगर, धात्रक फाटा, सागर व्हिलेज आदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अतिशय कमी दाबाने तेही अवेळी पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे महिलांना रात्री अपरात्री पाणी भरण्याची वेळ आली आहे.

याबाबत संबंधितांशी संपर्क साधूनही दाद मिळत नसल्याची येथील महिलांची तक्रार आहे. येत्या दोन दिवसांत हा प्रश्‍न न सुटल्यास परिसरातील महिलांसह विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा माजी प्रभाग सभापती शीतल माळोदे यांनी संबंधित यंत्रणेला दिला आहे.

"आडगाव परिसरातील श्रीसमर्थनगर येथे गेल्या काही दिवसांपासून अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे हे पाणी नियमित न येता रात्री अपरात्री कधीही येते."

- प्रमिला बैरागी, रहिवासी, समर्थ नगर

"धात्रक फाटा, सागर व्हिलेज भागात गत काही दिवसांपासून अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा आहे."- अश्‍विनी सहाणे, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT