महिलांच्या अंदाजपत्रकात बचत हाच उत्पन्नाचा मार्ग!
लॉकडाउनमुळे आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी घरोघरी नियोजन
नाशिक ः कोविड-19 मुळे दीड महिन्यांपासून लॉकडाउनमध्ये असलेल्या महिलांना आता भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटाची चाहूल लागली आहे. नोकरी व वेतनकपातीमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी कौटुंबिक अंदाजपत्रक तयार करण्याचे काम मध्यमवर्गापासून खालच्या वर्गात सुरू आहे. कौटुंबिक अंदाजपत्रक तयार करताना बचत हाच उत्पन्नाचा मार्ग गृहित धरून बचतीवर अधिक भर दिला जात आहे.
लॉकडाउनमुळे सर्वच प्रकारचे व्यवहार दीड महिन्यांपासून बंद आहेत. या काळात अर्थव्यवस्था भुईसपाट होत असल्याचे दिसून येत असून आहे. 17 मेपर्यंत महाराष्ट्रात लॉकडाउन आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाउन वाढण्याचीच दाट शक्यता आहे. जूनमध्ये शैक्षणिक प्रवेश सुरू होतील, तर फायनान्स कंपन्यांचे सहामाही हप्ते बहुतेकांचे येत असल्याने खर्च होणार आहे. त्यातच वेतनकपात व नोकऱ्यांमध्ये कपातीचे ढग निर्माण झाल्याने त्याचा परिणाम कुटुंबाच्या मासिक खर्चावर येणार आहे. त्यामुळे घरचा कारभार सांभाळणाऱ्या महिलावर्गाकडून होम बजेटमध्ये कपातीचा मार्ग अवलंबविण्यात आला आहे.
याची होणार कपात
- आरोग्य, शिक्षणावर खर्च कायम
- वार्षिक पर्यटन यंदा होणार नाही
- आठवड्यातून एकदा बाहेर खानपानाला कात्री
- कपडे ड्रायक्लिनिंग, ब्यूटिपार्लरच्या खर्चात कपात
- मॉल किंवा बाजारातील खरेदीवर मर्यादा
- मनोरंजनाचे खर्च मर्यादित
- मोबाईल डाटा सहा महिन्यांऐवजी एक महिन्याचे रिचार्ज
- आवश्यक असेल तरच वाहनांचा वापर
- अत्यावश्यक कामे एकाच फेरीत
- आठ दिवसांऐवजी महिन्याभराचा भाजीपाला खरेदी
- मौजमजेवरच्या खर्चात कपात
आर्थिक संकटामुळे घरच्या खर्चात कपात करणे गरजेचेच राहाणार आहे. घरखर्चाचा अंदाज बांधताना अनावश्यक खर्च टाळण्याचे प्रयत्न आहे.
- विद्या चव्हाण, गृहिणी, जेल रोड
घरखर्चाचे नियोजन करताना दैनंदिन गरजा, आरोग्य व शैक्षणिक गरजांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. परंतु अतिरिक्त गरजा कमी करता येणार आहेत.
- हर्षा सोमवंशी, गृहिणी, द्वारका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.