rutuja chawan.jpg 
नाशिक

इलेक्‍ट्रॉनिक सायन्सची 'ती' विद्यार्थिनी अल्पवयात कीर्तनकार!...500 हून अधिक कीर्तन - प्रवचन

मोठाभाऊ पगार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (देवळा) गावागावांत होणाऱ्या कीर्तन- प्रवचनात साधारणतः पुरुष कीर्तनकार आपल्याला दिसून येतात. परंतु वाखारी (ता. देवळा) येथील ऋतुजा चव्हाण यांनी अल्पवयात कीर्तनकार तथा बालप्रबोधनकार म्हणून लौकिक मिळवला आहे.

आतापर्यंत 500 पेक्षा जास्त ठिकाणी कीर्तन- प्रवचन
 

देवळा येथील शिवाजी चव्हाण यांच्या त्या कन्या आहेत. सध्या त्या चांदवड येथील नेमिनाथ जैन विद्यालयात इलेक्‍ट्रॉनिक सायन्सच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहेत. विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालत त्यांनी आतापर्यंत 500 पेक्षा जास्त ठिकाणी कीर्तन- प्रवचन करत आपल्या कार्याची चुणूक दाखवली आहे. त्यांच्या मते विज्ञाना जवळ गती आहे; पण दिशा नाही म्हणून या विज्ञान युगात योग्य दिशा देण्याचे काम आपण या आध्यात्मिक कार्यातून करत आहोत. विविध दाखले व दृष्टांत देत एखाद्या अभंगाचे निरुपण करणे व सलग एक-दीड तास समोरच्या श्रोत्यांना खिळवून ठेवणे हे कठीण काम त्या लीलया पार पाडतात. आपल्या कीर्तनातून संस्कारांचे महत्त्व, माता-पित्यांची सेवा, शिक्षणाचा आग्रह, राष्ट्रप्रेम, भारतीय संस्कृती, संतांचे कार्य, मुलींचे महत्त्व, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी विषयांवर त्या प्रबोधन करतात. 

विविध धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने त्यांच्या कीर्तनाला चांगली मागणी आहे. ऋतुजा यांचे कीर्तन ऐकताना ज्येष्ठ मंडळी तिचे कौतुक करतात. घरकाम, अभ्यास, शेतातील काम करून या कीर्तन-प्रवचन कार्यक्रमाचे नियोजन करावे लागते. पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी त्यांचे कीर्तन ऐकून हे संस्कारक्षम कार्य सुरू ठेवण्याचा संदेश दिला. त्यांच्या या वक्तृत्व कौशल्याचे महिलांना विशेष अप्रूप आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: ‘आघाडी’चे सर्वाधिकार पवारांना! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत निर्णय

Ambadi Flower Health Benefits: मासिक पाळी ते वजन वाढीच्या समस्येवर उपयुक्त; अंबाडीची फुले आहेत महिलांच्या आरोग्यासाठी वरदान

Mughal Era and Dalit : मुघलांच्या काळात दलितांची स्थिती कशी होती? यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले..

Nashik Tapovan : झाडांना आलिंगन, तुकोबांची गाथा! तपोवन वाचवण्यासाठी कवी, लेखक, कलावंत एकवटले; आंदोलनाला २० दिवस पूर्ण

Indian Boy Viral Truth : गरीब भारतीय तरूणाचं जर्मनीत खरचं नशीब बदललं? गेम ऑफ थ्रोन्समधील अभिनेत्री सोबतच्या फोटो व्हिडिओमागचं सत्य आलं समोर...

SCROLL FOR NEXT