नाशिक

वडांगळीत अंगणवाडी, आशा सेविकांचा सन्मान

CD
फोटो-22967 वडांगळी ः सेवा सप्ताहानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना गौरविताना प्रताप पाटील, अशोक भवारी, सुदेश खुळे, नानासाहेब खुळे, नीलेश भुजाळ आदी. अंगणवाडीसेविकांचा वडांगळीत सन्मान सिन्नर, ता. ७ ः सेवा संकल्प अभियानांतर्गत वडांगळी ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्थांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशासेविका, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सुदेश खुळे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील, गटविकास अधिकारी अशोक भवारी, प्रशासक डॉ. नीलेश भुजाळ, माजी सरपंच नानासाहेब खुळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सहाणे, विस्तार अधिकारी विजय पचलोरे, कृषी विस्तार अधिकारी गोसावी आदी उपस्थित होते. ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत महाश्रमदान झाले. पोषण आहार प्रात्यक्षिक, मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम व जंक फूडविरोधी जनजागृतीपर नाटिका, ‘पहिले पाऊल’ व ‘वेलकम मेळावा’, अन्नप्राशन, गरोदर व प्रसूत मातांना बेबी किट वाटप, बालकांचा वाढदिवस, हात धुण्याचे प्रात्यक्षिक, आकार कुशल प्रमाणपत्र वितरण आणि आरोग्य तपासणी असे उपक्रम राबविण्यात आले. सुदेश खुळे यांनी पद कोणतेही असो, जबाबदारी छोटी-मोठी असो; जनतेच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणण्यासाठी झटणारा प्रत्येक हात सन्मानास पात्र असल्याचे सांगितले. अशोक भवारी यांनी सेवा सप्ताहातील हा उपक्रम अनेकांच्या मनात माणुसकीची आठवण ठेवून गेल्याची भावना व्यक्त केली. उपमुख्याधिकारी प्रताप पाटील यांनी स्वच्छता, सेवा, त्याग समाजहितासाठी सातत्याने काम करण्याचे आवाहन केले. सुरेश कहांडळ, राहुल खुळे, सुखदेव अढांगळे, अनिल अढांगळे, संजय अढांगळे, अमोल अढांगळे आदींनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 'कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही केलं भाष्य

Kannad Drought : दुष्काळाच्या झळा! दुष्काळामुळे शेतीतील रोजगार संपला; ऊसतोडीला जाणा-या मजुरांच्या संख्येत मोठी वाढ

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

Latest Marathi News Live Update : रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांचा सन्मान

Karnataka Elections : ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी जिल्हा-तालुका पंचायतींचा रणसंग्राम; जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता; डिसेंबरमध्ये प्रक्रिया सुरू?

SCROLL FOR NEXT