Wood Cutting esakal
नाशिक

Nashik News : नाशिक रोडला माजी नगरसेवकांच्या आशीर्वादाने लाकूडतोडे सक्रिय

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : नाशिक रोडला सध्या काही माजी नगरसेवकांच्या आशीर्वादाने लाकूडतोडे सक्रिय झाले आहे. महापालिकेची कोणतीही परवानगी नसतानाही लाकूडतोडे ठिकठिकाणी झाडे तोडत आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमींनी नागरिकांना झाडे तोडताना माणसे दिसल्यास त्यांना झाडे तोडण्याची परवानगी मागावी आणि महापालिकेला ऑनलाइन फोटोसह तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. (Wood cutting active on Nashik Road with support of former corporator Nashik News)

नाशिक रोडला सध्या ठिकठिकाणी मोकळ्या जागांवरची झाडे तोडली जात आहेत. काही माजी नगरसेवकांच्या आशीर्वादाने हे झाडे तोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. ही झाडे तोडून ब्लॅक लिस्टेड ठेकेदार सध्या बाजारात विकत असल्याची चर्चा आहे. नाशिक रोड परिसरात अनेक ठिकाणी झाडे तोडण्याचे काम सध्या गुप्त पद्धतीने सुरू आहे. यासाठी नाशिकच्या वृक्षप्रेमींनी अशी झाडे कोणी तोडत असल्यास थेट त्यांचा फोटो आणि व्हिडिओ शूटिंग काढा, तसेच महापालिकेला ऑनलाइन तक्रार करा अथवा उद्यान उपायुक्तांना तक्रार करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

"झाडे वाढवायला अनेक वर्षे लागतात, मात्र तोडायला एक दिवस लागतो. कोरोनामध्ये ऑक्सिजनचे महत्त्व आपल्याला समजले आहे. नाशिक रोडमध्ये सध्या सर्रास वृक्षतोड मोठ्या संख्येने होत आहे. यामध्ये काही राजकीय पक्षाचे नेते छुप्या पद्धतीने सहभागी आहेत. त्यामुळे खासगी अथवा सरकारी जागेवर कोणी झाडे तोडत असल्यास तत्काळ महापालिकेच्या ई-कनेक्ट आपला तक्रार टाका. पुरावा म्हणून फोटो व शूटिंग आवश्यक आहे"

- वैभव देशमुख, वृक्षप्रेमी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT