Work is going on on a war footing to desilt the canal of the dam. esakal
नाशिक

SAKAL Impact : वैतरणा धरणाच्या कालव्याचे भगदाड बुजविण्याचे काम सुरू

मुंबई व उपनगरांना पाणीपुरवठा व बी पाॅइंट वीजनिर्मिती केंद्राला पाणी पुरविणाऱ्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत प्रसिद्ध झाले.

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Impact : मुंबई व उपनगरांना पाणीपुरवठा व बी पाॅइंट वीजनिर्मिती केंद्राला पाणी पुरविणाऱ्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत प्रसिद्ध झाले.

त्याची दखल घेत पाटबंधारे विभागाने भगदाड बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. (work of decommissioning canal of Vaitarna Dam is underway nashik news)

वैतरणा धरणाच्या मुख्य भिंतीलगतच्या जलविद्युत केंद्रातून वीजनिर्मिती करून बाहेर पडलेले पाणी कालव्याद्वारे थेट बी पाॅइंट वीजनिर्मितीसाठी जाते व त्यातून बाहेर पडलेले पाणी वैतरणा नदीपात्रातून मुंबई व उपनगरांना पुरविले जाते.

दोन वेळा वीजनिर्मिती करून ‌बाहेर पडलेले पाणी मुंबई शहराला पाणीपुरवठ्यासाठी दिले जाते. इतक्या महत्त्वाचा कालवा वारंवार फुटतो. त्याला भगदाडे पडतात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नाशिक जिल्ह्यातील धरणात पाणीसाठा मर्यादित आहे.‌

पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी जपून वापरावे लागत आहे. कालवा फुटून पाणी वाया जाणे योग्य नाही. भविष्यातील पाणीटंचाई डोळ्यासमोर ठेवून पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

मुंबई महापालिका व पाटबंधारे खाते धरणाच्या व कालव्याच्या देखभालीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही कालव्याला वारंवार भगदाड पडून पाणी व पैसा विनाकारण वाया जातो, असे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : बावधन पोलिस चौकीसमोरची परिस्थिती

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT