An error may occur while taking attendance at MNREGA work through NMMS app esakal
नाशिक

Nashik News : राज्यात रोजगार हमी योजनेतील कामे ठप्प; मनरेगा योजनेतील जाचक अटींचा फटका

सकाळ वृत्तसेवा

बाणगाव बुद्रूक : केंद्र सरकारने देशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर काम करणाऱ्या मजुरांची उपस्थिती नोंदविण्यासाठी १ जानेवारी पासून ग्रामरोजगार सेवकामार्फत मोबाईलद्वारे एनएमएमएस या प्रणालीचा वापर करून दिवसातून दोन वेळा (सकाळी ६ ते ११ या वेळात व दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत) फोटो घेणे बंधनकारक केले आहे.

परंतु ग्रामीण भागात इंटरनेटचा अभाव, एनएमएमएस प्रणाली वापरताना येत असलेल्या अडचणी यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी रोजगार हमी योजनेतील कामे ठप्प झाल्याचे चित्र आहे.केंद्र सरकारने देशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर काम करणाऱ्या मजुरांची उपस्थिती नोंदविण्यासाठी १ जानेवारी पासून ग्रामरोजगार सेवकामार्फत मोबाईल द्वारे एनएमएमएस या प्रणालीचा वापर बंधनकारक केला आहे.

यामध्ये कामावर आल्यावर मजुराचा दोन सत्रातील फोटो अपलोड केला तरच त्याला मजुरी मिळणार आहे. फोटो अपलोड झाला नाहीतर काम करून ही गैरहजर लागणार आहे.ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या ग्रामरोजगार सेवकांना मोबाईल देण्यात आलेला नाही. (Work under employment guarantee scheme stopped in the state hit by oppressive conditions of Manrega scheme Nashik News)

ज्या ग्रामरोजगार सेवकाकडे मोबाईल आहे.त्याच्या मोबाईलला ग्रामीण भागात नेट राहत नसल्यामुळे ग्रामीण भागात हे अँप चालत नाही. मोबाईल अँपवर फोटो घेता येत नाहीत. काही वेळेस मजूर दुपारच्या सत्रात कामाला येतात पण सकाळी मजूर नसल्याने सकाळी फोटो घेतला जात नाही

परंतु प्रणाली राबविताना विविध समस्या निर्माण झाली आहे. दुपारच्या सत्रात मजूर कामावर असले तरी फोटो घेता येत नाही. मोबाईल अँपवर मजुरांचा फोटो दिवसांतून दोन वेळा आला असेल तरच त्या मजुराला दिवसाची मजुरी मिळणार आहे.

अशी जाचक अट या आदेशात असल्यामुळे राज्यभरात वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत सुरू असलेली रोजगार हमी योजनेची सर्व कामे आता बंद पडली आहेत. ही कामे बंद पडल्यामुळे मजुरांची उपासमार सुरू झाली आहे.रोजगार हमीच्या कामावरील मजुरांचे एनएमएमएस प्रणालीद्वारे दिवसांतून दोन वेळा छायाचित्रांसह कार्यस्थळावरील मजुरांची उपस्थिती घेणे बंधनकारक केले आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

"ही सक्ती का केली जाते सरकारी कार्यालयात कर्मचारी सुद्धा दोनवेळा हजेरी घेतली जात नाही. मग मजुरांना का वेगळा न्याय का? हे ॲप चालत नाही. तसेच अनेकदा फोटो अपलोड होत नाही. यामुळे मजूर कामावर असताना ही त्यांची हजेरी लागत नाही. परिणामी त्यांना मजुरी मिळत नाही याची जबाबदारी कोणी घ्यायची. ही जाचक अट तात्काळ मागे घ्यावी."

- विलास गायकवाड, संचालक भोरी विकास सोसायटी

"एनएमएमएस या अँपद्वारे रोहयोच्या कामावरील ऑनलाइन हजेरी घेण्यासाठी रोजगार सेवकांना पूर्ण वेळ काम करावे लागणार आहे. शासन निर्णय प्रमाणे रोजगार सेवकांच्या सेवा अर्धवेळ आहे. त्यामुळे त्यांना अल्प मानधन मिळते तेही सहा महिन्यांनी मिळते. हे काम करण्यास रोजगार सेवक तयार आहे. शासनाने रोजगार सेवकांना पूर्णवेळ कर्मचारीचा दर्जा देऊन दरमहा फिक्स मानधन द्यावे."- राजू देसले राज्यध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: डोळ्यांत अश्रू, बोलायला शब्द नाहीत… शिक्षकाच्या मुलावर IPL लिलावात कोट्यवधींचा वर्षाव, बापाचं स्वप्न साकार झालं

Yashasvi Jaiswal Hospitalized : यशस्वी जैस्वालची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात तातडीने करावं लागलं भरती; कशी आहे प्रकृती?

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : वांद्रे–वरळी सी लिंकवर थरारक ड्रायव्हिंग, 250 किमी प्रतितास वेगाने कार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

SCROLL FOR NEXT