Pandharinath Maharaj Sahane while imparting spiritual education to children.
Pandharinath Maharaj Sahane while imparting spiritual education to children. 
नाशिक

World Disability Day 2023: दिव्यांग पंढरी महाराज देताहेत अध्यात्माचे शिक्षण!

विजय पगारे

World Disability Day 2023 : अनेकांचे शरीर भक्कम असूनही त्यांच्याकडून कोणतेही सामाजिक अथवा परमार्थिक काम होत नाही. मात्र, दिव्यांग असूनही अखंड धार्मिक कार्याने विद्यार्थी घडवून विठू नामाचा झेंडा जिल्ह्यात एक व्यक्ती रोवत आहे.

जन्मताच दोन्ही पायांनी अधू असतानाही इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील पंढरीनाथ महाराज सहाणे यांनी वारकरी संप्रदायाची पताका आपल्या परमार्थिक भक्कम कार्याने मजबूत केली आहे. (World Disability Day 2023 disabled Pandharinath Maharaj Sahane give spiritual education to children nashik news)

दिव्यांग असूनही पंढरीनाथ महाराज तालुक्यातील होतकरू मुलांना हरिपाठ, गायन, वादन व पठण कोणत्याही प्रकारचे मानधन, दक्षिणा न घेता शिकवतात. गरीब होतकरू मुलांना कपडे तसेच साहित्य घेण्यासाठी पदरमोड करून वस्तू घेऊन देण्यास त्यांचा पुढाकार असतो. आतापर्यंत त्यांनी सातशेपेक्षा जास्त मुलांना मोफत शिक्षण दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे.

दिव्यांग असूनही त्याच्यावर मात करत गुरुवर्य नागोराव बहादूरे, निवृत्ती महाराज घोरवडकर यांच्याकडून वारकरी संप्रदायाचे त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर ३० वर्षांपासून ते सेवा देत आहे.

पिंपळगाव घाडगा, निनावी, भरवीर बुद्रुक, टाकेद, धामणगाव, बेलू, पिंपळगाव डुकरा, घोटी खुर्द, आगसखिंड आदी गावांमध्ये ते अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजनही करतात.

परमेश्वराचे चिंतन करीत या देहापासून जगाला काहीतरी फायदा व्हावा, अशी इच्छा ते व्यक्त करतात. मुलांवर योग्य संस्कार व्हावे, यासाठी दर वर्षी उन्हाळी सुटीत बालसंस्कार शिबिरही घेतात. त्र्यंबकेश्वर येथे सातत्याने वारी करतात. टाळ-मृदंगाच्या गजरात रोज साकूर परिसर दुमदुमतो. दिव्यांगत्व मन पिळवटून टाकणारे असले तरी मनमोकळे स्वीकारून आत्मिक समाधानासाठी ते मुलांना मोफत अध्यात्मिक शिक्षण देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT