नाशिक

जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेषः नैराश्‍य, ताणतणाव ठरतेय मानसिक आजारांचे मुळ

CD
लोगो : जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष नैराश्‍य, ताणतणाव ठरतेय मानसिक आजारांचे मूळ वास्‍तविक अनुभव आणि प्रत्यक्ष बदल गरजेचा; तज्‍ज्ञांचे मत सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : वयाच्‍या विविध टप्प्‍यांवर अन्‌ विभिन्न सामाजिक परिस्थितीत आज प्रत्‍येकाला ताणतणावाने ग्रासले आहे. सात्‍यताने असलेला ताणतणाव, नैराश्‍य हेच बहुतांश मानसिक आजारांचे मुळ ठरत असल्‍याचे निरीक्षण मानसोपचार तज्‍ज्ञांनी नोंदविले आहे. यंदाच्‍या संकल्‍पनेवर भर देताना वास्‍तविक अनुभव आणि प्रत्‍यक्ष बदल सध्याच्‍या काळाची गरज बनल्‍याचेही नमूद केले आहे. जगभरात १० ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्‍हणून पाळला जातो. यंदा या दिनासाठी वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थने ठरविलेली संकल्‍पना ‘अनुभवांचे प्रकटीकरण : खरी संवादाची भाषा, खरा बदल’ अशी आहे. मानसिक त्रासाचा प्रत्यक्ष सामना केलेल्‍या व्‍यक्‍तींचे अनुभव ऐकून धोरणात्मक व सामाजिक बदल घडवून आणणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगात सुमारे १०० कोटी नागरिक कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येने ग्रस्त आहेत. यामध्ये नैराश्य आणि चिंतेचा वाटा सर्वाधिक आहे. कामाच्या ठिकाणी वाढत्या ताणामुळे दरवर्षी जगभरात तब्बल १२ अब्ज कामाचे दिवस वाया जातात, ज्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होतो. भारतातही राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार साधारण १० टक्क्यांहून अधिक प्रौढ नागरिकांना तातडीने मानसिक उपचारांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. --- ताणतणाव असा घालवावा - मनातील भावना, चिंता किंवा भीती दाबून न ठेवता विश्वासू व्यक्तींशी बोला - वर्क लाइफ बॅलन्‍स करा. कामाच्या वाढत्या ताणाचा वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ देऊ नका. - रोज ७ ते ८ तासांची पुरेशी झोप, संतुलित आहार आणि योगासने तणाव कमी होतो. - सोशल मीडियावरील अतिवापर टाळून प्रत्यक्ष संवादाला प्राधान्य द्या. डिजिटल डिटॉक्‍स महत्त्वाचा. - सततची अस्वस्थता, निद्रानाश किंवा चिडचिड जाणवल्यास संकोच न बाळगता समुपदेशकांचा सल्‍ला घ्या. - एखादा छंद जोपासतांना, ताणतणावाचा निचरा होईल, यासाठी प्रयत्‍न करा. --- दृष्टीक्षेपात * जगभरात मानसिक आजाराने १०० कोटी नागरिक बाधित. * मानसिक आजारांचा सामना करणारे ७ पैकी १ व्‍यक्‍ती १० ते १९ वयोगटातील * ८० टक्‍के रुग्ण सामाजिक लाजेपोटी उपचारांपासून वंचित राहतात. --------- ‘टेलिमानास’ मार्फत मोफत मार्गदर्शन मानसिक ताणतणाव, नैराश्‍य किंवा अन्‍य समुपदेशनासाठी केंद्र शासनाच्‍या आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण विभागामार्फत नॅशनल टेलि मेंटल हेल्‍थ प्रोग्रॅम ऑफ इंडिया हा उपक्रम राबविला जातो आहे. याअंतर्गत ‘टेलि-मानस’ मार्फत मोफत समुपदेशन सेवा उपलब्‍ध आहे. त्‍यासाठी १४४१६ किंवा १८००-८९१-४४१६ या क्रमांकावर २४ तास संपर्क साधता येऊ शकतो. देशभरातून सुमारे ४७ लाख लोकांनी या सहाय्यता क्रमांकावर संपर्क साधत मदत मिळविलेली आहे. --- कोट मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील मोठे आव्हान म्हणजे मानसिक आजारांबद्दल समाजातील गैरसमज आणि कलंक. मानसिक त्रासासाठी मदत घेणे हे कमकुवतपणाचे नव्हे, तर धैर्याचे लक्षण आहे. मानसिक आजारावर मात केलेल्‍या व्‍यक्‍तींनी पुढे येऊन इतरांना बरे होण्यासाठी प्रोत्‍साहित करणे गरजेचे आहे. - डॉ. प्रिया राजहंस, मानसोपचारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : परवानगी रद्द केल्यानंतरही आंदोलन; ‘एमपीएससी’ आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

गुलाबजामच्या पाकात उंदीर, भिवंडीतील मिठाईच्या दुकानात किळसवाणा प्रकार; Video Viral होताच एफडीएचा छापा

Maharashtra Live News : बारामतीत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय! सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यासह सर्व बंडखोरांची हकालपट्टी

IND vs WI 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला आज तरी संधी मिळाली का? श्रेयस अय्यरने जाहीर केली Playing XI, विंडीजच्या संघात एक बदल

Kannad News : जामडी (घाट) येथे 19 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन संपविले जीवन; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT